नवी दिल्ली। दिल्ली महापालिका निवडणुकीचे (Delhi Municipal Elections) पडघम वाजायला सुरुवात झाली आहे; मात्र ‘आप’च्या ऑनलाईन प्रचाराचा (AAP’s online campaign)सामना करण्यासाठी भाजपनेही (BJP) कंबर कसली आहे. ५०,००० ‘नमो सायबर योद्धा’ नियुक्त करून भाजप आता ‘आप’ ला घेरणार आहे. त्यामुळे या ऑनलाइन प्रचारामध्ये कोण बाजी मारत हे येणारा काळच सांगणार आहे.
गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आप’कडून भाजपच्या महापालिकेतील गैरव्यवहाराचा पर्दाफाश होत आहे. त्यामुळे जेरीस आलेल्या भाजपनेही या ऑनलाइन प्रचाराचा सामना करण्यासाठी ‘नमो सायबर योद्धा’ ही संकल्पना अंमलात आणली आहे. दिल्ली प्रदेश भाजपकडून आता शहरात ऑनलाईन व्हॉलेंटियर कॅम्पेन राबवण्यासाठी पन्नास हजार कार्यकर्त्यांची नियुक्ती होणार आहे. या कार्यकर्त्यांना ‘नमो सायबर योद्धा’ (‘NAMO cyber warriors’)असे संबोधले जाणार आहे.
याबाबत भाजपचे प्रवक्ता शहजाद पुनावाला म्हणतात की, आप सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटा प्रचार करीत आहे. या प्रचाराला सडेतोड प्रत्युत्तर ‘नमो सायबर योद्धा’ देणार आहेत. त्यासाठी भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता व विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिथुडी हे या’ नमो सायबर योद्धयांना ‘ मार्गदर्शन करणार आहेत. भाजपने केलेल्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि ‘आप ‘च्या प्रचाराला प्रत्युत्तर देणे अशी जबाबदारी या ‘नमो योद्धांना’ पार पाडावी लागणार आहे.(BJP is afraid of online campaigning:)