मुंबई।कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील (Karnataka assembly elections) दारुण पराभवानंतर आता महाराष्ट्र भाजप ( Maharashtra BJP)सावध झाली आहे. कर्नाटकचा धडा घेऊन आपली रणनीती बदलली आहे. त्यातूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी अंजुमन-ए-इस्लाम सोसायटीचे (Anjuman-e-Islam Society) अध्यक्ष डॉ. जहीर काझी (Zaheer Qazi) यांची भेट घेतल्याने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर मुंबई कशी काबीज करता येईल,याकडे भाजपने लक्ष दिल्याचे अधोरेखित होत आहे.
अंजुमन-ए-इस्लाम सोसायटीचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे सामाजिक कार्य असल्याने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या संस्थानशी संबंधित बहुतांश अल्पसंख्याक समाजातील लोक कोकणी मुस्लिम आहेत.
कर्नाटक निवडणुकीत मुस्लिम समाजाची एकतर्फी मते काँग्रेसच्या बाजूने गेली. मुस्लिम मतांचे विभाजन झाले असते, तर भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता होती. कर्नाटक राज्य महाराष्ट्राला लागून आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होऊ नये, यासाठी भाजपने मुस्लिम समाजातील बुद्धिजीवी वर्गाच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी मुस्लिमबहुल मालवणी (मालाड) परिसराला भेट दिली. येथे मुस्लिम समाजात प्रभाव असलेले डॉ.इशरार अहमद यांची त्यांनी भेट घेतली. एकतर मालवणी परिसर मालाड विधानसभा मतदारसंघांतर्गत येतो. तेथे मुस्लिम समाजाचे अस्लम शेख हे काँग्रेसचे आमदार आहेत. एका अंदाजानुसार महाराष्ट्रात 12 टक्के मुस्लिम (एक कोटी 30 लाखांहून अधिक) आहेत.तर मुंबई शहरात सुमारे 25 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे आणि उपनगरात सुमारे 19 टक्के आहे. मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, दक्षिण मुंबई आणि ईशान्य लोकसभा मतदारसंघात मुस्लीम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मुस्लिम समाजातील विचारवंतांची भेट घेऊन या समाजाच्या मनात भाजपबद्दल काय भावना आहे. जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच हिंदुत्वाचा आवाज देणाऱ्या महाराष्ट्र भाजपने एकाकी भूमिका बदलत मुस्लिम मतांवर आता डोळा ( Muslim vote bank) ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.(BJP has changed its strategy: Now BJP’s eye on the Muslim vote bank!)