Nawab Malik targets Narendra Modi

‘पुलवामाचा राजकीय फायदा घेत भाजप निवडून आले’

पुणे|  आमच्यात कशी फूट पडेल, हे भाजपवाले बघत आहेत. मात्र, त्यांनी एनडीएकडे लक्ष द्यावे. एनडीएत कोणीही राहायला तयार नाही. नितीश कुमार कधीही सोडून जातील. आम्ही एकजुटीने सरकार चालवत आहोत. गोव्यात सरकार राहील की नाही, याची चिंता करा. पुलवामाच्या घटनेनंतर तो आरडीएक्स कुठून आला, आजपर्यंत त्याचा अहवाल त्यांनी दिला नाही. पुलवामानंतर जी परिस्थिती या देशात निर्माण झाली त्याचा फायदा घेऊन भाजप या देशात सत्तेत आले आहे. ७ वर्षे देशात सत्ता असताना आतंकवाद संपत नाही. चीनचे अतिक्रमण संपत नाही. २०१९ ला मोदी साहेबांच्या कामगिरीवर नव्हे तर, पुलवामाचा राजकीय फायदा घेत भाजप निवडून आले होते, अशी टीका  राष्ट्रवादीचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर केली आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत मोदींच्या कामगिरीवर नव्हे तर, पुलवामाचा राजकीय फायदा घेत भाजप निवडून आले होते. आज जी परिस्थिती आहे त्यावर लोक भाजपवर नाराज आहे. २०२४ ला या देशात मोदी सरकार सत्तेत राहणार नाही, हे स्पष्ट आहे. परिणामी भविष्यात परिवर्तन अटळ आहे. आणि परिवर्तन होणार आहे, असेही ते म्हणाले. 

देशात वेगवेगळे प्रश्न असताना युपीएच्या बैठकीत ज्यावर चर्चा व्हायला हवी होती ती झाली नाही, हे सत्य आहे. आम्ही या देशात सगळ्यांची मूठ बांधण्याचे काम करत आहोत. आणि ही मूठ काँग्रेसला घेऊनच बांधण्यात येणार आहे.  ज्यांना चिंता वाटत आहे की, काँग्रेस राहणार की ममता. शरद पवार हे एक चाणक्य आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. देशात सर्व पक्षांची मोट बांधताना काँग्रेसला सोबत घेऊनच जाणार आहोत. कोणी स्वप्नातही बघितले नव्हते की शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील, ते आज एकत्र आले आहेत. सगळ्यांची मूठ बांधण्याचे काम हे शरद पवार करतील. कोणालाही बाहेर न ठेवता सर्व एकत्र येतील, याकडेही  मलिक यांनी लक्ष वेधले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *