By making Eknath Shinde the Chief Minister by undermining the Shiv Sena, the BJP has targeted many people in Maharashtra politics with one arrow. It is at this time that the BJP has taken up arms. Discussions are going on in the political circles that MNS supremo Raj Thackeray's son Amit Thackeray has been offered a ministerial post to give support to Shiv Sena. As a result, all eyes are now on the new innings in state politics.

BJP:शिवसेनेला शह देण्यासाठी आता भाजपची बाजी अमित ठाकरेंवर!

मुंबई।शिवसेनेला (SHIVSENA)  सुरुंग लावून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपने (BJP) महाराष्ट्राच्या राजकारणात एका बाणाने अनेकांवर निशाणा साधला आहे.परिणामी  उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray)  शिवसेनेवरील  नियंत्रणही आता संपुष्टात आले असताना म्हणा किंबहुना त्यांच्यावर आता अस्तित्व टिकविण्याची वेळ ओढवलेली आहे. नेमक्या याचवेळी भाजपने एक हत्यार उपसले आहे.   शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (MNS supremo Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे  (Amit Thackeray)यांना मंत्रिपदाची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात घडत आहे. परिणामी आता कोणता नवीन डाव राज्याच्या राजकारणात रंगतो याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)   आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांची   राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी भेट झाली. ही राजकीय भेट असून अमित ठाकरे  यांचे राजकारणात पदार्पण होणार असल्याच्या चर्चा आता   सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पावसामुळे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट रद्द झाली होती. आता ती झाल्याने पुढे काय या मुद्द्याकडे  संपूर्ण राज्याचे लक्ष  लागले आहे.
नवे सरकार स्थापन होऊनही महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची शिंदे सरकारमध्ये  एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. सध्या अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या   विद्यार्थी संघटनेचे  (MNS Vidyarthi Sena) म्हणजेच मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख आहेत. मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून ते राजकारणात सक्रिय झाले असून शिवसेनेचा गढ असलेल्या कोकणात सभा घेत आहेत. तिथे मनसेच्या मजबूतीकरणाकडे त्यांनी लक्ष घातले आहे.
 भाजपने   मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आणि पुत्र अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर दिली होती. अमित ठाकरे सध्या विधानसभा किंवा विधान परिषद सदस्य नाहीत. असे असतानाही त्यांना मंत्री करण्याचा निर्णय हा शिवसेनेतील ठाकरे कुटुंबाचा प्रभाव कमी करण्याचा आणखी एक प्रयत्न असू शकतो. भाजपने नुकतेच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ठाकरे कुटूंबात नवा  वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
 शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची बाजी अमित ठाकरेंवर आहे. गेल्या काही वर्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) शिवसेनेची सूत्रे हाती घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. इतकेच नाही तर, प्रशासकीय अनुभवासाठी ते वरळी विधानसभेतून आमदार झाले. पुढे मंत्री झाले. अशा परिस्थितीत अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात आणण्याच्या हालचाली आदित्य ठाकरे यांच्यासाठी थेट आव्हान म्हणून पाहिले जात आहे. अमित आणि आदित्य या दोघांनाही तरुणांना त्यांच्या कॅम्पमध्ये आणण्यासाठी युवा नेते म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे.(By making Eknath Shinde the Chief Minister by undermining the Shiv Sena, the BJP has targeted many people in Maharashtra politics with one arrow.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *