Bihar Chief Minister Nitish Kumar has made an important announcement regarding the race of his chief ministerial candidate in the 2025 assembly elections. He announced himself. Nitish said in the meeting of Mahaghadi on Tuesday that the 2025 assembly elections will be fought under the leadership of Tejashwi Yadav. My aim is to defeat the BJP in the 2024 Lok Sabha elections. I have no desire to become Chief Minister or Prime Ministerial candidate. He made it clear that way.

Bihar CM Nitish Kumar:२०२४ ला भाजपला पराभूत करणे हेच टार्गेट !

पाटणा ।बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी(Bihar CM Nitish Kumar)  २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत (2025 assembly elections) आपण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी स्वतःच ही घोषणा केली. शिवाय २०२४ ला भाजपला पराभूत करणे (2024 is the target to defeat the BJP) हेच टार्गेट असल्याचे स्पष्ट केले. 

महाआघाडीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत नितीश म्हणाले २०२५ ची विधानसभा निवडणूक तेजस्वी यादवांच्या (Tejashwi Yadav)नेतृत्वात लढली जाईल. माझे लक्ष्य २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यावर आहे. माझी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानपदाचा उमेदवार बनण्याची इच्छा नाही.असेही त्यांनी स्पष्ट केले.

अर्थमंत्री व जदयुचे ज्येष्ठ नेते विजय चौधरी यांनी सांगितले की, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर महाआघाडीच्या विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्यानंतर तेजस्वी यादव यांचे नेतृत्व असेल असे स्पष्ट केले. त्यानुसार २०२५ ची विधानसभा निवडणूक तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लढली जाईल.

नालंदात सोमवारी डेंटल कॉलेजच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते की, आम्ही तर केव्हापासून बिहारचा विकास साधण्याचे काम करत आहोत. पण आता तेजस्वींना पुढे करण्याची वेळ आली आहे. जेवढे करायचे होते तेवढे आम्ही केले. आता यांच्याकडून एकेक काम करवून घ्यायचे आहे. त्यासाठी आता हे सर्वकाही पाहत आहेत, समजून घेत आहेत. एकेक काम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, सरकार नितीश कुमार यांच्या नेतृत्वात सर्वोतपरी पाऊले उचलत आहे. मुलभूत सोईसुविधा, शिक्षण, औषधी व जनतेचे उत्पन्न वाढवण्यावर आमचा जोर आहे.(Bihar Chief Minister Nitish Kumar: 2024 is the target to defeat the BJP!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *