'This' strategy of Congress for Maharashtra

Bharat Jodo Yatra:महाराष्ट्रासाठी काँग्रेसची ‘ही’ रणनीती

मुंबई । काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला (Congress leader Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra) अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. परिणामी काँग्रेसमध्येही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातूनच महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती (Congress has planned a strategy for Maharashtra)आखली असून भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, प्रियंका  गांधी  (Sonia Gandhi, Rahul Gandhi and Priyanka Gandhi)यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले  आहे. 

याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी म्हटले आहे की,  महाराष्ट्रासाठी आमची रणनीती तयार झालेली आहे. महाराष्ट्रातील जनता ही नेहमीच काँग्रेससोबत राहिलेली आहे. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आपापल्या भागात येऊन सभा घ्यावी, अशी लोकांची इच्छा आहे. लोकांची हीच इच्छा आम्ही पूर्ण करत आहोत, असेही नाना पटोले म्हणाले.राज्यातील सहा आयुक्तालयांमध्ये रॅली काढणार आहोत. मुख्यत्वे जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांसह शेतकऱ्यांच्या समस्यांवर भर राहणार आहे.
 भारत जोडो यात्रेदरम्यान, सावरकरांचा मुद्दा उपस्थित करण्याची गरज होती का? यावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले , राहुल गांधी काँग्रेसचा विचार घेऊन चालले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रलोभनांना बळी पडले. त्यामुळे ते वाचले. त्यांना ६० रुपये पेन्शन मिळाले. यापेक्षा जास्त प्रलोभनं भगवान बिरसा मुंडा यांना देण्यात आली होती. मात्र देशाच्या मातीशी आणि जनतेशी धोकाधडी करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे वयाच्या २४ व्या वर्षी ते शहीद झाले. याच मुद्द्याला घेऊन राहुल गांधी यांनी तो विषय काढला होता. राहुल गांधी यांनी मुद्दामहून तो विषय काढला नव्हता. राहुल गांधी यांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडली होती. त्यामुळे एवढी चिंता करण्याची गरज नाही, असे  नाना पटोले म्हणाले. तसेच महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबतही त्यांनी भाष्य केले. आम्ही आमचा विचार चालवत आहोत. त्यामुळे कोणाला काही वाटत असेल तर त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.(Bharat Jodo Yatra:’This’ strategy of Congress for Maharashtra)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *