Former RBI governor N Raghuram Rajan has joined Congress leader Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra. Rahul Gandhi had a long discussion with Rajan. Both used to talk continuously till tea break. Raghuram Rajan has a clear opinion on the economic issue.

Bharat Jodo Yatra: राहुल गांधी – आरबीआयचे माजी गव्हर्नर एन रघुराम राजन यांच्यात चर्चा 

सवाई माधोपूर ।आरबीआयचे माजी गव्हर्नर एन रघुराम राजन (former RBI governor N Raghuram Rajan) काँग्रेस नेते  राहुल गांधींच्या  भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra)सामील झाले आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजन यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. चहाच्या ब्रेकपर्यंत दोघेही सतत बोलत होते. रघुराम राजन हे आर्थिक मुद्द्यांवर (economic issue)स्पष्ट मत मांडत आहेत.त्यामुळे या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला यापेक्षा मोदी सरकारचे आर्थिक निर्णयाचा देशाला बसणारा फटका त्यातही नोटबंदीने काय साध्य झाले यावरील मुद्दे आगामी काळात पुन्हा गाजणार असल्याची चिन्हे आहेत.  

राहुल गांधी आणि रघुराम राजन यांच्यात अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली. एका डॉक्युमेंटरीसाठी दोघांनीही आर्थिक मुद्द्यांवर आपली मते मांडली. यूपीएच्या दुसऱ्या कार्यकाळात रघुराम राजन यांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनवण्यात आले होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील ‘भारत जोडो यात्रेने’ तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमधील प्रवास पुर्ण केला असून आता राजस्थानमध्ये यात्रा पोहचली आहे.१२  राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणाऱ्या भारत जोडो यात्रेचा समारोप जम्मू आणि काश्मीर मधील श्रीनगर येथे होणार आहे.

आठवडाभराचा ब्रेक

राजस्थान-हरियाणा सीमा ओलांडल्यानंतर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आठवडाभराचा ब्रेक मिळणार आहे. २४ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत प्रवासात ब्रेक असेल. प्रवासाच्या सुट्टीच्या दिवसात राहुल गांधी हिवाळी अधिवेशनात सहभाग घेऊ शकतात.(Bharat Jodo Yatra: Rahul Gandhi – Discussion with former RBI governor N Raghuram Rajan)

1 thought on “Bharat Jodo Yatra: राहुल गांधी – आरबीआयचे माजी गव्हर्नर एन रघुराम राजन यांच्यात चर्चा ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *