कन्याकुमारी ।‘भारत जोडो’ यात्रेला (Bharat Jodo Yatra)पक्षासाठी ‘जीवन संरक्षक’ म्हणून संबोधून, कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Congress general secretary Jairam Ramesh)यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले की, ही यात्रा पक्षाला नवी संजीवनी देईल. तसेच, पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक आणि सक्रिय होण्यास मदत करेल. आज या यात्रेमुळे विरोधक त्रस्त झाले आहेत असा टोलाही जयराम रमेश यांनी लगावला आहे.
१३७ वर्षांच्या इतिहासात काँग्रेस अनेक वेळा वेगवेगळ्या परिस्थितीत दिसून आली आहे. त्यामुळे हा प्रवास काही पक्षासाठी नवा नाही. या यात्रेमुळे काँग्रेस (Congress)पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक आणि सक्रिय होणार आहे असा विश्वासही जयराम रमेश यांनी व्यक्त केला. आजही देशाच्या कानाकोपऱ्यात काँग्रेसचे अस्तित्व आहे. काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष असून सत्तेत नसला तरी तो प्रत्येक परिसरात, गावागावात आहे. ‘भारत जोडो यात्रे’वर भाजपकडून होणाऱ्या टीकेवर ते म्हणाले, ही भारत जोडो यात्रा आहे. भाजप काय म्हणतोय याची मला पर्वा नाही. माझे लक्ष भारत जोडो यात्रेवर आहे.या यात्रेचा एक भाग म्हणून सकाळी १३ किमीचे अंतर कापण्यात आले आणि नेत्यांना सुचिंद्रम, कन्याकुमारी येथे पोहोचण्यासाठी सुमारे तीन तास लागले, असेही ते म्हणाले.(Bharat Jodo Yatra: Congress ready to counter BJP’s divisive politics: Jairam Ramesh)