लुधियाना। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान एका कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत. लुधियानातील एका समारंभात मान यांनी एका नवीन प्लांटचे उद्घाटन केले. या समारंभाला अनेक गावातील शेतकरी आले मात्र या समारंभात काळी पगडी घातलेल्या शेतकऱ्यांना प्रवेश देताना त्यांच्या पगड्या उतरविण्याचा (Punjab police ‘presumed’ to remove their turbans while giving entry to the black turbaned farmers) ‘प्रताप’ पंजाब पोलिसांनी केल्याने शेतकऱ्यांनी आम आदमी पक्षासह (Aam Aadmi Party) मुख्यमंत्री भगवंत सिंह मान (Chief Minister Bhagwant Singh Mann) यांच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त करून निषेध नोंदविला आहे.
या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये मुख्यमंत्री भगवंतसिंह मान आणि आम आदमी पक्षाविरोधात संताप उसळला आहे. ज्या मिल्क प्लांटचे उदघाटन होते. तेथील कामगारांनाही ज्यांनी काळे फेटे घातले होते, त्यांनाही समारंभाला उपस्थित राहू दिले गेले नाही. परिणामी हा कार्यक्रम आमच्यासाठी असताना देखील पोलिसांनी आम्हाला कार्यक्रमात सहभागी होऊ दिले नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान या झालेल्या प्रकारानंतर काही चूक झाली असेल तर माफी मागतो अशी सारवा-सारव आमदारांकडून करण्यात आली आहे.(Bhagwantsinh Maan: Sikh brothers angry with AAP for ‘that’ type)