Balasaheb Thorat:... then the government would not have collapsed!

Balasaheb Thorat:… तर  सरकार कोसळले नसते!

मुंबई।मी नाराज असल्याचे मला मीडियामुळे समजले. मी नाराज नव्हतोच, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Senior Congress leader Balasaheb Thorat)यांनी म्हटले आहे. तर शरद पवारांना (Sharad Pawar)  विचारून जर पहाटेचा शपथविधी झाला असता, तर सरकार कोसळले नसते, अशा शब्दात   पहाटेच्या शपथविधीवर   प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले,  शरद पवार यांच्या सहमतीने हे झाले नाही असे माझे मत आहे. भाजपकडून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना मुख्य मुद्द्यांना हात घालायचा नसतो म्हणून ते जनतेची अशी दिशाभूल करतात असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

नाराजीच्या मुद्द्यावर बोलताना थोरात यांनी मी नाराज नव्हतो असे स्पष्ट केले  तसेच माझ्या नाराजीच्या चर्चा या मला मीडियाच्या मार्फत कळल्या.  मी नाराज नव्हतोच, प्रत्येक संघटनेत पत्र व्यवहार सुरू असतो. तसा आम्ही केल्याचे सांगतानाच त्यांनी  भाजपवर आरोप केला . 

 काँग्रेस एक परिवार असून बाळासाहेब थोरात यांचे सर्व गैरसमज मी दूर केले आहेत, असे काँग्रेस प्रभारी नेते एच. के. पाटील यांनी रविवारी सांगितले.काँग्रेसच्या रायपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनात बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात यांची संपूर्ण बाजू   मी ऐकून घेतली. मात्र, काँग्रेस एक परिवार आहे. हा विषय परिवारातील अंतर्गत असल्याचे सांगतानाच सत्यजित तांबेंवर काही चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. थोरातांचे काही गैरसमज झाले आहेत, ते लवकरच दूर करू. लहान, मोठ्या समस्या येतच असतात.असेही ते म्हणाले. (Balasaheb Thorat:… then the government would not have collapsed!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *