Although the Chief Minister-Deputy Chief Minister succeeded in reconciling MLA Bachchu Kadu and Ravi Rana, who had reached literal 'guddyas' from 'boxes', on this occasion, Deputy Chief Minister Devendra Fadnavis narrated the 'inside story' that MLA Bachchu Kadu had gone to Guwahati on my own phone call. This 'confession' is being discussed in the circle. Deputy Chief Minister Devendra Fadnavis reacted to the much talked about Ravi Rana vs. Bachchu Kadu controversy in Amravati saying that it is wrong to say that Bachchu Kadu made a deal with anyone or he did something wrong.

Bachchu Kadu – Ravi Rana Controversy : माझ्या एका फोनने … देवेन्द्र फडणवीसांकडून ‘कबुलीनामा’!

मुंबई। ‘खोक्यां’वरून शाब्दिक ‘गुद्द्यां’वर पोहचलेला आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादात  समेट घडविण्यात मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांना   यश मिळाले असले तरी यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी मात्र  माझ्याच एका फोन कॉलवर आमदार बच्चू कडू हे गुवाहाटीला गेल्याची ‘इनसाईड स्टोरी’ कथन केल्याने राजकीय वर्तुळात या ‘कबुलीनाम्या’ची चर्चा रंगत आहे. 

बच्चू कडू   यांनी कोणाशी काही सौदा केला किंवा त्यांनी काही उलटं-सुलटं केले  हे म्हणण चुकीचे  आहे, अशा शब्दात  अमरावतीमधील बहुचर्चित रवी राणा विरुद्ध बच्चू कडू  (MLA Bachchu Kadu and Ravi Rana)वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत  प्रतिक्रिया दिली.  यावेळी त्यांनी हा विषय आता संपला असल्याचे  सांगत या वादावर पडदाही टाकला.मात्र या  ‘इनसाईड स्टोरी’मुळे गुवाहाटीप्रकरणाचे कर्तेकरवीते भाजपच यावर आता खुलेआम शिक्कामोर्तब झाले आहे  गुवाहाटीला गेलेल्या  सेनेच्या आमदारांबाबत    सुरुवातीला शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न असल्याची सावध भूमिका घेणाऱ्या भाजपला मात्र फडणवीस यांच्या सत्तेसाठीच आम्ही बच्चू कडू यांना गुवाहाटीला पाठवल्याच्या विधानामुळे आता तोंडघशी पडावे लागले आहे.

बच्चू कडू यांना क्लिन चीट देताना देवेंद्र फडणवीस यांनी कडू यांची शिंदे गटासोबत गुवाहटीला जाण्याची इनसाईड स्टोरीही सांगितली. ते म्हणाले, बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहटीला गेले होते. मी स्वतः त्यांना फोन केला. मी त्यांना सांगितले  की, आम्हाला सरकार बनवायचे  आहे आणि तुम्ही आमच्यासोबत हवे आहात. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या गटात यावे. त्यानंतर ते गुवाहटीला गेले. सोबतच माझी ही पक्की माहिती आहे की, जे गुवाहटीला गेले ते पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन गेले. उद्या जर आवश्यक संख्या नसेल तर आपलं पद जाऊ शकतं, याची सर्वांना कल्पना होती. तरीही पूर्ण विश्वास शिंदे यांच्यावर होता, म्हणून ते गेले.असेही ते म्हणाले.(Bachchu Kadu – Ravi Rana Controversy : ‘Confession’ from Devendra Fadnavis with one of my phones!)  
 
  आता दोघांनीही ठरवले आहे की विकासासाठी काम करायचे  

मी स्वतः आणि मुख्यमंत्र्यांनी रवी राणा आणि बच्चू कडू यांना बोलावून  घेतले  होते . आम्ही दोघांशीही चर्चा केली. त्यावेळी रवी राणांनी मान्य केले  की मी हे रागात बोललो, मला तसं बोलायचे नव्हते , कोणाला दुखवायचं नव्हते . पण माझ्याविरोधात बच्चू कडू यांनी काही वक्तव्य केली त्यामुळे मी हे रागात बोललो. बच्चू कडू यांनीही हे मान्य केले  की मीही रागारागात बोललो.दोघांनीही मान्य केले  की  आम्ही केलेली वक्तव्य बरोबर नाहीत. आता दोघांनीही ठरवले आहे की विकासासाठी काम करायचे  आहे. यात दोघांचही भलं आहे. त्यानंतर रवी राणा यांनी दिलगीरी व्यक्त केली. त्यामुळे आता हा विषय  (now this topic is over)संपला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *