पुणे। सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन् मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून ( ashadhi wari 2023)निघालेल्या हजारो वैष्णवांनी( pilgrimage) पुणे मुक्कामी पर्जन्य यज्ञातून बा विठ्ठला … बळीराजासह नागरिकांना समृद्धी दे,शेतकऱ्यांचे अकाली ‘मरण ‘ टळू दे… सर्वसामान्यांना आता महागाईतून ‘मुक्ती ‘ दे …जगामध्ये समाजातील सर्वधर्मसमभाव एकोपा कायम राहू दे! अशी प्रार्थना करून वरुणराजाला साकडे घातले. यावेळी पाद्यपूजनाच्या सोहळ्याने वारकरी भारावले.
दरवर्षी माजी उपमहापौर, पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल ( Aba Bagul) व मित्रपरिवार आणि पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे (Pune Navratri festival) वारकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही वारकऱ्यांचे पाद्यपूजनाने स्वागत करण्यात आले. चौरंग पाट , सुगंधी तेल,गुलाब पुष्प,स्वस्तिक, फुलांची रांगोळी हे शाही स्वागत अनुभवताना वारकरीही भारावले होते. प्रारंभी वारकऱ्यांच्या हस्ते पर्जन्य यज्ञ संपन्न झाला. यावेळी वारकऱ्यांनी दुष्काळ कायमस्वरूपी हटू दे, बळीराजा सुखी होऊ दे… सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे,असे साकडे वरुणराजाला घातले.
माजी उपमहापौर व पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांच्या वतीने शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिरात वारकऱ्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्वधर्मियांकडून वारकरी बांधवांच्या पायाला तेलाने मालिश करण्यात आली. सिनसन फार्मास्युटिकल केझर व आबा बागुल मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी डॉ. कल्पेश पाटील यांच्यासह मोहन आगलावे, ओमप्रसाद बिरादार , लखन पाटील यांनी वारकऱ्यांची ब्लडप्रेशर, शुगर तपासणी करून औषधोपचार केले तसेच वारकऱ्यांसाठी दाढी करणे,चप्पल बुटांची दुरुस्तीही करण्यात आली. वारकरी बांधवांना भजनासाठी उत्तम व्यवस्था श्री लक्ष्मी माता मंदिरात करण्यात आली असल्याचेही आबा बागुल यांनी सांगितले.
आबा बागुल म्हणाले की जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन आम्ही गेली ३० वर्षे वारकऱ्यांची सेवा करत आहोत. पंढरीच्या वाटेवर जाणाऱ्या वैष्णवांचे पाद्यपूजन करून त्यांचे स्वागत करण्यात आले. कोरोनासारखे संकट पुन्हा जगावर येऊ नये,सामान्यांचे जगणे सुसह्य व्हावे, समाजात एकोपा कायम राहावा, बळीराजा सुखी होऊ दे यासाठी विठ्ठलाला साकडे घातले आहे असे आबा बागुल म्हणाले.
यावेळी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे पदाधिकारी नंदकुमार बानगुडे, घनशाम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल,सागर बागुल,हेमंत बागुल तसेच महेश ढवळे सागर आरोळे,अभिषेक बागुल, इम्तियाज तांबोळी, समीर शिंदे, संतोष पवार, बाबासाहेब पोळके,सुरज सोनावणे व कार्यकर्ते उपस्थित होते.