They arrested two ministers in our government. They arrested number two and three leaders. So that they can arrest me. is.' If I am dishonest, then no one is honest in the world. With these words, Aam Aadmi Party convener and Delhi Chief Minister Arvind Kejriwal hit hard at CBI, ED, Prime Minister Narendra Modi.

Arvind Kejriwal:जबरदस्तीने अडकवण्याचा हा डाव!

नवी दिल्ली । ‘यांनी आमच्या सरकारमधील दोन मंत्र्यांना अटक केली. त्यांनी दोन आणि तीन क्रमांकाच्या नेत्यांना अटक केले. जेणेकरून ते मला अटक करू शकतील.  आहे.’ जर मी अप्रामाणिक असेल तर जगात कोणीही प्रामाणिक नाही.अशा शब्दात आम आदमी पार्टीचे निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सीबीआय, ईडी, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (CBI, ED, Prime Minister Narendra Modi)  जोरदार निशाणा साधला. 

 दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्ली मद्य धोरण घोटाळा (alcohol policy scam) प्रकरणात जेलमध्ये आहेत. आता या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने 16 एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. तपास संस्थेने शुक्रवारी केजरीवाल यांना समन्स जारी केला. यात केजरीवाल यांना सीबीआय कार्यालयात हजर राहण्यास सांगितले.

तत्पूर्वी केजरीवाल यांनी शनिवारी दुपारी  पत्रकार परिषद घेऊन सीबीआय, ईडी, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. 

केजरीवाल म्हणाले  सीबीआय-ईडीने मनीष सिसोदियांवर आरोप केले की, त्यांनी पुरावे लपवण्यासाठी 14 फोन तोडले. 5 फोन ईडी आणि सीबीआयकडे आहेत. बाकीचे फोन एका कार्यकर्त्यांकडे असतात. ते नियमित ते फोन वापरत नाहीत. तपास यंत्रणांनीही न्यायालयात खोटे बोलून खोटे आरोप करून मनीष सिसोदिया यांचा जामीन रोखत आहे, असा घणाघाती आरोपही  केजरीवाल यांनी यावेळी केला.केजरीवाल म्हणाले  ,चंदन रेड्डी नावाचा कोणीतरी आहे. या लोकांनी त्याला एवढी मारहाण केली की, त्याला ऐकू येत नाही. त्याच्या कानाचा पडदा फाटला. सीबीआय-ईडी त्यांना काय उघड करायचे आहे? त्याला थर्ड डिग्री का दिली जात आहे? अरुण रेड्डी, समीर महेंद्रू आणि अजून किती लोक आहेत माहीत नाही, ज्यांचा छळ केला जात आहे आणि आमच्या विरोधात जबाब नोंदविले जात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *