Arvind Kejriwal in trouble: Arvind Kejriwal summoned in liquor scam case

Arvind Kejriwal in trouble:  मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवालांना समन्स 

नवी दिल्ली।दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याचा (liquor scam case )तपास आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Chief Minister Arvind Kejriwal) यांच्यापर्यंत पोहोचला आहे. आता सीबीआय ( CBI) आम आदमी पार्टीचे ( Aam Aadmi Party) निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करणार आहे. त्यांना 16 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.
 दिल्ली सरकारने 17 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर दिल्ली सरकारने महसूल वाढीसोबतच माफिया राजचा अंत करण्याचा युक्तिवाद केला होता, मात्र नेमके उलटे झाले. दिल्ली सरकारचा महसूल बुडाला. जुलै 2022 मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी एलजी व्हीके सक्सेना यांना एक अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये मनीष सिसोदिया यांच्यावर दारू व्यापाऱ्यांना अवाजवी लाभ दिल्याचा आरोप करण्यात आला होता. 
त्यामुळे  या प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष  सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने  26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. मनीष सिसोदिया यांची अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) तुरुंगात चौकशी केली होती. चौकशीनंतर ईडीने मनीष सिसोदिया यांना तुरुंगातूनच अटक केली होती.   याप्रकरणी मनीष सिसोदिया यांनी राऊज अव्हेन्यू कोर्टात याचिका दाखल करून जामीन मागितला होता. मात्र, न्यायालयाने ते मान्य केले नाही.
नायब राज्यपालांनी या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची शिफारस केली होती. एलजींच्या शिफारसीनंतर सीबीआयने  17 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. 
या प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यासह 15 जणांना आरोपी करण्यात आले होते. 22 ऑगस्ट रोजी ईडीने अबकारी धोरणात मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. सुमारे 6 महिन्यांच्या तपासानंतर सीबीआयने  फेब्रुवारी महिन्यात मनीष सिसोदिया यांना अटक केली. तेव्हापासून मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत.आता या कथित मद्य घोटाळ्याचा तपास  आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल   यांच्यापर्यंत पोहोचला आहे.
त्यात नुकतेच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा लाभलेल्या आम आदमी पार्टीकडून विशेष करून निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शिक्षण हा मुद्दा गाजवून त्यांच्या डिग्रीविषयी संशय व्यक्त करून ती दाखवण्याची  मागणीही केली होती. न्यायालयाने त्यावरून केजरीवालांना २५ हजारांचा दंडही ठोठावला होता. मात्र त्यानंतरही केजरीवाल यांच्याकडून मोदींना लक्ष्य करण्यात येत होते. त्यात आपकडून देशभरात मोदी हटावचे बॅनर लावून जनआंदोलन उभारण्याचा प्रयोग सुरु झाला आहे. 
त्यामुळे आता दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात केजरीवाल यांची चौकशी करून त्यांना प्रकरणात अडकविण्याची खेळी भाजपकडून होत असल्याचा आरोप राजकीय पटलावर गाजण्याची चिन्हे आहेत,असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे येत्या 16 एप्रिलला केजरीवाल यांची चौकशी होऊन त्यांना अटक होते का ? हा मुद्दा राजकीय वर्तुळात  गाजणार आहे. तसे झाले तर भाजपविरोधात देशव्यापी आंदोलनाला खऱ्याअर्थाने सुरु होईल. असेही अनुमान राजकीय विश्लेषकांचे आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *