Amit Palekar is the Chief Ministerial candidate from AAP in Goa Panaji. The Aam Aadmi Party (AAP) has formally announced Amit Palekar, a well-known politician, lawyer by profession, but an influential social activist and a leading figure in the anti-corruption movement. The Aam Aadmi Party on Tuesday gave the face of the Chief Minister's post in Punjab. Today Delhi Chief Minister and Aam Aadmi Party National Convener Arvind Kejriwal has announced that Amit Palekar will be AAP's chief ministerial candidate in Goa. "Amit Palekar is a lawyer by profession and he comes from the Bhandari community," said Arvind Kejriwal. According to reports, Palekar's recent hunger strike has brought him a lot of publicity. Palekar had gone on an indefinite fast to save the heritage site of old Goa.

गोव्यात ‘आप’कडून अमित पालेकर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार

पणजी।
प्रसिद्ध राजकारणी, व्यवसायाने वकील ;पण सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रभावी ओळख निर्माण करणारे आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना जेरीस आणणाऱ्या अमित पालेकर यांची गोव्यातील मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून आम आदमी पक्षाने औपचारिकरित्या घोषणा केली आहे.
आम आदमी पक्षाने मंगळवारी पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला. आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी अमित पालेकर हे गोव्यात ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याची घोषणा केली. अमित पालेकर हे व्यवसायाने वकील असून ते भंडारी समाजातून येतात, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. अहवालानुसार, पालेकरांच्या नुकत्याच झालेल्या उपोषणामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. जुन्या गोव्यातील वारसास्थळ वाचवण्यासाठी पालेकर यांनी बेमुदत उपोषण केले होते. या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केले जात होते. पालेकर यांची प्रकृती खालावल्याने केजरीवाल यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले होते की, पालेकरांचे बेमुदत उपोषण आणि त्यांना गोवावासीयांकडून मिळणारा पाठिंबा पाहून अखेर सरकारला दखल घेणे भाग पडले. पालेकर हे गोव्यातील सांताक्रूझ परिसरात राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. २०१७ पासून ते आम आदमी पक्षाशी संबंधित असले तरी त्यांच्यासाठी राजकारण नवीन नाही. त्यांची आई दहा वर्षे सरपंच होती.अमित पालेकर यांनी कोरोनाच्या काळात लोकांना खूप मदत केली. देशभरातील रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता असताना पालेकर यांनी स्वत:हून १३५ खाटा स्थानिक रुग्णालयाला दान केल्या होत्या. रुग्णांना उपचार देण्यासोबतच त्यांनी लॉकडाऊनमध्ये प्रवास करणाऱ्या कुटुंबांनाही मदत केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *