पुणे ।आम्ही तिथं हरणार म्हटल्यावर तिथं थांबून कसं चालेल. मी त्यांनाच विचारणार आहे की,असा कोणता मतदारसंघ ठेवणार आहे का ? जिथे आम्ही निवडून येऊ शकतो असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी (NCP leader Ajit Pawar) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP’s state president Chandrashekhar Bawankule)यांना लगावला आहे.
लोणीकंद येथील एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी बावनकुळे यांच्या विश्वासाहर्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दोन दिवसाआधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी बारामतीचा गड आम्ही नक्कीच जिंकू, असे विधान केले होते.यावर भाष्य करताना विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात अजून कुठे मला आणि माझ्या बहिणीला मतदार संघ मिळतोय का बघतो. कारण आता आम्ही तिथे हरणार म्हटल्यावर तिथे थांबून कसं चालेल, मी त्यांनाच विचारणार आहे, की असा कोणता मतदार संघ ठेवणार आहे का ? जिथे आम्ही निवडून येऊ शकतो असा उपरोधिक टोला यावेळी बावनकुळे यांना लगावला.
नुसत्या गप्पा मारायचे काम ते करतात, ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही. पत्नीला दिलेली उमेदवारी पण पुन्हा काढून घेतली जाते. ही त्यांची विश्वासहर्ता. त्यांनी माझ्याकडे येऊन काय गप्पा माराव्यात.असा सवाल करून मी खंबीर आहे,असेही पवार म्हणाले.(Ajit Pawar’s ironic taunt to the BJP state president: I will ask ‘them’ only… are they going to keep any such constituency?)