Ajit Pawar criticizes Eknath Shinde government: If all the work is done by the secretary, why should the Chief Minister?

Ajit Pawar’s criticism of Raj Thackeray: ‘हे’ एवढे दिवस काय झोपा काढत होते का?

शिर्डी।सध्या महाराष्ट्रातील राजकारण बदलत चालले आहे. राज्यात काहीजण अचानक बाहेर निघतात आणि अचानकच भोंगे  (Masjid Loudspeakers)बंद   करण्याची भाषा करतात. मग हे एवढे दिवस काय झोपा काढत होते का?, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar)  यांनी नाव न घेता राज ठाकरे( Raj Thackeray)    यांच्यासह भाजपला (BJP) लगावला आहे.

अशाच वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणायच्या व विकासाला महत्त्व देण्याऐवजी वेगळी चर्चा समाजात घडवून आणायची, समाजात दरी कशी निर्माण होईल याकडे लक्ष दिले जाते, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
आपण किती वर्षांपासून महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने राहत आहोत. एकमेकांच्या सणांचा आदर करत आहोत.
एकमेकांना शुभेच्छा देत आहोत. ही आपली संस्कृती आणि हीच आपली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. शाहू-फुले-आंबेडकरांनी हाच विचार मांडला आहे. अशा भोंग्यांच्या गोष्टी करून विकास होत नाही, अशी टीकाही राज ठाकरे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *