Ajit Pawar's comment on Pune Lok Sabha by-election

Ajit Pawar’s comment on Pune Lok Sabha by-election:जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा! 

पुणे । खासदार गिरीश बापट यांना जाऊन 3 दिवस झालेत, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा असा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुणे पोटनिवडणुकीबाबत वक्तव्य करणाऱ्यांना (Ajit Pawar’s comment on Pune Lok Sabha by-election) लगावला आहे.

 खासदार गिरीश बापट यांच्या मृत्यूनंतर (death of Member of Parliament Girish Bapat)पुण्यात लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होत आहेत. यावर अजित पवार म्हणाले, कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. आज पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना जाऊन 3 दिवसच झाले आहेत. एवढी काय घाई आहे, माणूसकी आहे कि नाही, महाराष्ट्राची काही परंपरा आहे की नाही. लोक म्हणतील यांना थोडी तरी जनाची मनाची लाज आहे कि नाही. 

जयंत पाटील वारंवार राष्ट्रपती राजवट लागणार याबाबत विधान करत आहेत. यावर बोलताना  अजित पवार यांनी याबाबत मला काहीही माहित नाही. मी जयंत पाटलांना भेटून त्यांच्याकडे नेमका काय ‘क्लू’आहे, याबाबत माहिती घेतो. असे पवार म्हणाले. त्यांचे वक्तव्य समजून घेण्याचा प्रयत्न करेन.असेही ते म्हणाले. 

 सावरकर गौरव यात्रेवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, राष्ट्रीय महापुरुषांबाबत आदर राखायला हवा. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचे काम भाजपचे राज्यपाल, प्रवक्ते यांनी केले होते. त्यावेळी सातत्याने अशी वक्तव्ये होत होती.  छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्यावेळी गौरवयात्रा का काढावीशी वाटली नाही? असा सवालही  पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला यावेळी विचारला. महागाई, बेरोजगारीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी आता सावरकर गौरव यात्रा काढत असतील, असे अजित पवार म्हणाले.(Ajit Pawar’s comment on Pune Lok Sabha by-election: Be ashamed of your mind if not your people!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *