नागपूर । पुरावे नसताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये टाकले. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातले १४ महिने वाया गेले. त्यांचा दोष काय होता? खासदार संजय राऊत यांच्याबाबतही तसेच घडले. त्यांचाही दोष काय होता? निष्पापांना जेलमध्ये टाकण्यापेक्षा महापुरुषांचे अपमान करणाऱ्यांना तुरुंगात धाडा. त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडेल, असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत (assembly)केला.शिवाय एवढ्या महापुरुषांचा अपमान (insulting the great man) होऊनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प कसे? (How can the Chief Minister – Deputy Chief Minister remain silent despite insulting great men?) तुम्हाला राग कसा येत नाही? असा संतप्त सवालही केला.
विधानसभेत सत्ताधाऱ्यांच्या नाकी नऊ आणणारे आणि डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे भाषण करताना अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), मंत्री चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, मंगलप्रभात लोढा आणि इतर वादग्रस्त बोलणाऱ्या नेत्यांची अक्षरशः पिसे काढली. यावेळी सभागृहात मात्र चिडीचूप शांतता अनुभवायला मिळाली.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरही अजित पवारांनी जोरदार आक्षेप घेतला.
ते म्हणाले, शिवरायांचा जाज्वल अभिमान बाळगणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळखय. त्यांचा झालेला अपमान महाराष्ट्राच्या जनतेला पटलेला नाही. शिवाजी महाराज पुराने जमाने के है. आजचे आदर्श नितीन गडकरी. त्यांच्याबद्दलही आम्हाला सार्थ अभिमान आहे, पण गडकरी साहेब आणि शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकेल का? असा सवाल त्यांनी केला.राज्यपालांकडून कल्पना करो, शादी दस साल में ही कर दी थी. तब जोतीराव तेरा साल के उमर के थे. तब वो क्या करते होंगे शादी के बाद. हातवारे करून, हसत-हसत हे विधान केले जाते. मुख्यमंत्री काही कामानिमित्त दिल्लीला जाऊ शकतात. त्यांनी दिल्लीत वरिष्ठांच्या कानावर घातले पाहिजे होते. काल जसे ठोकून सांगितले, मुंबई आमची मग तसेच इथेही करावे, असे आवाहन पवारांनी यावेळी केले.
समर्थाशिवाय शिवाजीला कोण विचारतोय?, असे राज्यपाल म्हणाले. कितीदा आमच्या युगपुरुषांचा अपमान करता. त्यांच्या अपमानाचा विडा उचलून आलाय का? राजमाता जिजाऊंनी त्यांना बाळकडू दिले. एका जाहीर कार्यक्रमात चुकीचा इतिहास सांगितला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःला शांतीदूत समजायचे. त्यांच्यामुळे देश कमकुवत राहिला, असे कोश्यारी म्हणाले. मात्र, त्यावेळी देशात टाचणी तयार व्हायची नाही आणि आता असे बोलले जाते. हे बाकीचे करण्यापेक्षा पंडित नेहरूंबद्दलचे चार पुस्तके वाचा ना. पहाटे चारला उठता. संविधानिक पदाची शोभा राखण्यासाठी असली वक्तव्य टाळावीत,असेही अजित पवार म्हणाले.
मुंबईबद्दल राज्यपाल काय म्हणाले तर गुजराती – राजस्थानी माणसाला मुंबईच्या बाहेर काढले, तर मुंबईत पैसा उरणार नाही. ही भाषा राज्यपाल महोदयांची. त्यांना एकनाथ शिंदे यांचे सरकार अस्थिर करायचे आहे का? त्यामुळे हे सुरू आहे का? अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप, आक्रोश, चीड आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर जाहीर आक्षेप आणि निषेध नोंदवतील, अशी अपेक्षा होती. साधा निषेध नोंदवत नाहीत. माघारी बोलावतील अशी अपेक्षा होती. पण झाले नाही मग ही महाराष्ट्राची शोकांतिकाच आहे.
शिवरायांचा गनिमा कावा कुठला? तुमचा गनिमा कावा कुठला? तुम्हाला मंत्रिपद हवंय. त्यांना कुठं हरबऱ्याच्या झाडावर चढवताय. छत्रपतींचा गनिमी कावा हिंदवी स्वराज्यासाठी होता. तुमचा गनिमी कावा कशासाठी होता? याचाही विचार केला पाहिजे. मंगलप्रसाद लोढा पहिल्यांदा मंत्री झाले. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिवराय जसे निसटले, तसे शिंदे निसटले म्हणतात. एक जण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला म्हणतात. शेंबड्या पोराला विचारले, तर सांगतो त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला. तुम्ही वेळ काढा. इतिहासाची माहिती घ्या…माहिती नसेल, तर बोलू नका. एक म्हणतात, अफजलखानाने शिवाजी महाराजांचा कोथळा बाहेर काढला, हे काय सुरू आहे? अशी संतप्त भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.
सुधांशू त्रिवेदी म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली. हा निल्लर्जपणाचा कळस आहे. तुम्हाला राग कसा येत नाही? इतिहास तोडून – मोडून मांडता. तुमची सटकत कशी नाही? सटकली पाहिजे. एवढ्या महापुरुषांचा अपमान होऊनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प कसे? हे प्रकरण गंभीर आहे. यापुढे कोणत्याही महापुरुषाचा अपमान सहन केला जाणार नाही. नको त्या निष्पाप लोकांना जेलमध्ये टाकण्यापेक्षा महापुरुषांचे अपमान करणारे तुरुंगात टाका. त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडू द्या. आपण प्रतापगडाच्या जवळ राहता, अशा परिसराचे प्रतिनिधित्व करता. याचा विचार करा. अशा शब्दात अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री,मंत्र्यांना खडे बोल सुनावले. (Ajit Pawar:How is the Chief Minister and Deputy Chief Minister silent?,Throw ‘them’ in jail!)