पुणे ।कोण संजय राऊत?(Who is Sanjay Raut?) मी कोणाचंही नाव घेतले नव्हते. मी माझ्या पक्षासंदर्भात बोललो होतो, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar:)यांनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊतांना ( Sanjay Raut) पुन्हा एकदा टोलाच लगावला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर ( NCP leaders) भाजप (BJP ) दबाव टाकत आहे. तपास यंत्रणांचा वापर करून भाजप फोडाफोडीचे राजकरण करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर इतर पक्षाच्या प्रवक्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसची वकिली करू नये, अशा शब्दात अजित पवारांनी संजय राऊतांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याला पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी प्रत्युत्तर देताना शिवसेना फुटली तेंव्हा तुम्ही आमची वकिली करत होतात. आता मी मविआची वकिली केली म्हणून माझ्यावर खापर का फोडत आहात?, असा सवाल संजय राऊत यांनी अजित पवारांना केला होता तसेच, अजितदादांनीच भाजपचा काय डाव आहे?, हे स्पष्ट करुन सांगावे, असे आवाहनही राऊत केले होते. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामाचा आढावा अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी तुम्ही सांगितल्यानंतरही संजय राऊत सल्ले देत आहेत, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कोण संजय राऊत, मी माझ्या पक्षाच्या संदर्भात बोललो असल्याने कोणाला लागायचे काहीच कारण नाही, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर भाजप दबाव टाकत आहे. तपास यंत्रणांचा वापर करून भाजप फोडाफोडीचे राजकरण करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर तुम्हाला आमचे वकीलपत्र घेण्याची काय आवश्यकता आहे. आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्या पक्षात जेष्ठ प्रवक्ते आहेत. ते आमची भूमिका मांडतील, असा पलटवार अजित पवारांनी केला होता. त्यानंतर आज पुन्हा अजित पवारांनी कोण संजय राऊत असे म्हणल्याने अजित पवार आणि संजय राऊत यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.