upcoming Lok Sabha - Assembly elections Deputy Chief Minister ajit pawar NCP PUNE NEWS

Ajit Pawar: आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुका महायुतीतर्फे लढणार ! 

पुणे। भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे सरकारमध्ये (Eknath Shinde government) सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीतील (NCP) फुटीर गटाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा  ( upcoming Lok Sabha and Vidhan Sabha) महायुतीतर्फे लढणार असल्याचे जाहीर करताना आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे असेही स्पष्ट केले आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  पक्ष नेमका कुणाचा ? हा प्रश्न आजमितीसही कायम असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( NCP chief Sharad Pawar) आणि अजित पवार ( (Ajit Pawar) ) यांच्यात सुरु असलेला ‘कलगीतुरा’ आणखी रंजक होणार असल्याचे चित्र आहे मात्र हे सर्व ‘ठरवून’ या सदरात होत आहे का ? हा संशय आणखी बळावत आहे. 

अजित पवार हे  उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी- चिंचवड शहरात आले होते. त्यांचे  मोठ्या उत्साहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे, संजोग वाघेरे यांच्यासह इतर पदाधिकारी होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.  

आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही असे स्पष्ट करताना अजित पवार म्हणाले की, मला सत्कारावेळी अनेकांनी सर्व महापुरुषांशी निगडीत वस्तू दिल्या, त्या मी घेतल्या. जर त्या घेतल्या नाही तर म्हणणार काय हा उपमुख्यमंत्री झाला तर काय नाटकं करतोय, किती ताटलाय असे  म्हणणार? सांगायचे  तात्पर्य हे की आम्ही भाजप आणि शिंदे गटाच्या सत्तेत सहभागी झालोय. पण आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. सर्व- धर्म समभाव हीच आमची विचारधारा आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. शिवाय  विधानसभा आणि लोकसभा आपण महायुतीतर्फे लढणार आहोत. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे.

  नेत्यांनी आणि नागरिकांनी ठरवायचे की…

महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे  काय? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण येईल. या पूर्वी काँग्रेस पक्षासोबत आघाडी होती ती परिस्थिती राहील, असेही  अजित पवार यांनी स्पष्ट केले.  त्या- त्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, शहरातील नेत्यांनी आणि नागरिकांनी ठरवायचे की युती करायची की एकट्याच्या ताकदीवर लढायचे. निवडून येणार असाल अशी खात्री असेल तर तुम्ही युती करू नका. मतांची विभागणी न होता युती केली पाहिजे, तर युती करा, असेही  अजित पवार म्हणाले.Ajit Pawar: The upcoming Lok Sabha – Assembly elections will be fought by the Grand Alliance!

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *