Former Deputy Chief Minister Ajit Pawar has challenged Chief Minister Eknath Shinde to prove that he demanded a percentage from the Vedanta project. Chief Minister Eknath Shinde in his Dasara Mela speech alleged that the previous government had asked for a percentage for the Vedanta Foxconn project. Ajit Pawar has reacted to it.

Ajit Pawar on Vedanta: मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान,टक्केवारी मागितल्याचे सिद्ध करा

पुणे ।वेदांता प्रकल्पावरून टक्केवारी मागितली हे सिद्ध करा, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना दिले आहे. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसऱ्या मेळाव्यातील भाषणात वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पासाठी  यापूर्वीच्या सरकारने टक्केवारी मागितल्याचा आरोप केला. त्यावर अजित पवार यांनी (Ajit Pawar on Vedanta) प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील तळेगावला होणारा ​​वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. तीन कंपन्यांच्या शर्यतीत कुठेही नसलेल्या गुजरातमध्ये हा प्रकल्प गेल्याने शिवसेनेसह महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात  आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडूनही टीकेला प्रत्युत्तर दिले जात असतंस  वेदांताचा  राज्यातील प्रकल्पाबाबतचा अहवाल बाहेर आला आहे.त्यात शिवसेनेने शिंदे सरकार आणि भाजपला खिंडीत पकडले   आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर आरोपांचा भडिमार सुरू आहे. वेंदाता प्रकल्पात किती टक्केवारी मागितली, असा गंभीर आरोप करीत शिवसेनेने हिशोब द्यावा, अशी मागणी  भाजपचे नेते आशिष शेलारांनी   केली होती. शिवसेनेकडून अद्याप प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. मात्र, मनपा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद चांगलाच चिघळणार  आहे. या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यां थेट  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे आता शिंदे – फडणवीस सरकारकडून कोणते प्रत्युत्तर मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Ajit Pawar on Vedanta: Direct challenge to Chief Minister, prove that he asked for percentage)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *