Ajit Pawar: Shinde government's attempt to impose unannounced emergency in the state

Ajit Pawar:महाराष्ट्र बंद … उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद 

पुणे। “मुख्यमंत्री एकनाथ यांच्यासह (Chief Minister Eknath Shinde) आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. त्यांना शुभेच्छा. कामाख्या देवीला रेड्याचा बळी दिला जातो. शिंदे गट आता कोणाचा बळी द्यायला गुवाहाटीला चालले आहेत, हे माहीत नाही,” असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.शिवाय महाराष्ट्र बंदबाबतच्या (Maharashtra bandh) उद्धव ठाकरे (Udbhav Thackeray)यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील सत्तांतरांचे नाट्य गुवाहाटीत घडले होते. त्याठिकाणी मुख्यमंत्री शिंदे आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. या मुद्यावर पवार म्हणाले,  देवदर्शनाला जात असतील तर शुभेच्छा आहेत. काही ठिकाणी कोंबड्याचा, बकऱ्यांचा  बळी देतात. परंतु कामाख्या देवीला रेड्याचा बळी देतात, ते कोणाचा बळी द्यायला जात आहेत, माहीत नाही. असेही ते म्हणाले. 

ज्यावेळी लोक सांगतात,विरोधी पक्षात बसा त्यावेळी विरोधी पक्षात राहून काम करावे लागते. पुन्हा लोकांनी जर सत्तेत बसण्याची जबाबदारी दिली तर पालकमंत्री म्हणून बसणारच आहोत,   अशी टिपण्णीही पवार यांनी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून उद्भव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद करण्याची वेळ येऊ देवू नका, असा इशारा दिला होता. त्यावर ठाकरे यांच्या आवाहनाला आपला  ‘सकारात्मक प्रतिसाद’ राहील, असेही  पवार यांनी यावेळी  स्पष्ट केले.(Ajit Pawar: Maharashtra bandh… Positive response to Uddhav Thackeray’s call)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *