मुंबई। मुख्यमंत्री पदावर(CM) दावा ठोकणाऱ्या आणि २०२४ नव्हे तर आताही मुख्यमंत्री होण्यासाठी तयार आहे अशी रोखठोक भूमिका मांडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी ‘ नॉट रिचेबल’ वरून होणाऱ्या बातम्यांबद्दल खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘माझ्याबद्दल अनेक बातम्या पसरवण्याचे काम सध्या सुरू आहे. मी जराही इकडे – तिकडे गेलो की, पत्रकार म्हणतात, अजित पवार नॉट रिचेबल!’ (Ajit Pawar Not Reachable) माझ्यामागे हे का लागलेत बाबा? एखाद्याच्या किती मागे लागायचं? मी असे का बोलतो हे ते विचारतात. पण मला जे येते ते मी बोलतो. लोकांना वाटते 2019 ला केले तसे करेल की काय? याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवारांनी त्यांच्याबाबत होणाऱ्या अफवांवरही मत व्यक्त केले. तसेच भाजपमध्ये (BJP) जाण्याच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला. मागच्यावेळी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अजित पवारांच्या प्रत्येक हालचाल आणि वक्तव्य गाळून पाहिले जाते. याच धर्तीवर त्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, मी पुन्हा एकदा सांगतो मी कायम राष्ट्रवादीतच (NCP)राहणार आहे. असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
नगर जिल्ह्याला ‘सीएम’ पदाचा मान ?
दरम्यान मुख्यमंत्री पदावर दावा ठोकणाऱ्या अजित पवारांनी आता ही भूमिका का आणि कशासाठी ? घेतली यावर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क सुरु झाले आहेत मात्र भाजपचे सरकार टिकणार आहे. मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे जातील ;पण देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा ‘सीएम’ होण्याचे स्वप्न भंग पावणार आहे. भाजपमधून सहकार क्षेत्रातील दिग्गज अनुभवी असलेल्या ;पण बाहेरून भाजपमध्ये आलेल्या व्यक्तीच्या गळयात मुख्यमंत्री पदाची माळ घातली जाईल. यंदा नगर जिल्ह्याला ‘सीएम’ पदाचा मान मिळेल. असा दावा राजकीय निरीक्षकांचा आहे.
Ajit Pawar: Do people think he will do what he did in 2019?