Vanchit Bahujan Aghadi leader Adv. Prakash Ambedkar

Adv. Prakash Ambedkar: परदेशातील भारतीयांनी  केंद्र सरकारला  जाब विचारावा  

सांगली ।केंद्र शासनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरण ( international level policy )विचारपूर्वक दिसत नाही. देशातील मुस्लिम समाजाशी ज्या पध्दतीने वागते, त्याच पध्दतीने अन्य राष्ट्राशी वागत असून हाच मापदंड ख्रिश्‍चन समाजाबाबत असेल तर अमेरिका युरोपबाबत लावला जाणार का? परदेशात राहणार्‍यांनी केंद्र सरकारला आमचे नातेवाईक का धोक्यात घालता असा सवाल विचारला पाहिजे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी केले. 

  सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi)सत्ता संपादन निर्धार सभा झाली. तत्पूर्वी  अ‍ॅड. आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, राज्यात अदृष्य शक्ती मराठा आणि ओबीसी समाज भिडवण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला.ते म्हणाले   मराठा आरक्षण हा निझामी मराठा आणि रयतेचा मराठा असा लढा असून गेली ७० वर्षे सत्तेत असणार्‍या निझामी मराठ्यांनी रयतेतील मराठ्यावर अन्याय केला असून मनोज जरांगे-पाटील हे रयतेतला मराठ्यांचे नेतृत्व करीत आहेत.

 अदृष्य ताकद राज्यात ओबीसी आणि मराठा समाज भिडविण्याचे काम करीत आहे. धनगर समाज आरक्षण मुद्दा पुन्हा आला आहे. ३ डिसेंबर रोजी चार राज्यांचा निकाल हाती येतील, त्यानंतर ६ डिसेंबर नंतर अयोध्या येथून नवी मोहिम हाती घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.माध्यमांशी बोलतांना अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळबाबत आपण तीन दिवसांनी सविस्तर भूमिका मांडू.(Adv. Prakash Ambedkar: Indians abroad should hold the central government accountable)http://purepolitics24.com/wp-content/uploads/2023/11/SANGLI.jpg

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *