मुंबई| शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यामुळे आता महाराष्ट्र भाजपच्या वॉर रूममध्ये धोक्याची घंटा वाजली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला (shivsena)पुन्हा जिवंत करण्यासाठी आदित्य ठाकरे हे राज्यभर फिरत आहेत. एकीकडे राज्याच्या राजकारणात नवीन राजकीय घडामोडी घडवण्यासाठी शिंदे गटाने भाजपसोबत जुळवून घेतले असले तरी आदित्य ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यामुळे (Aditya Thackeray’s statewide tour:) मुंबई आणि ठाण्यासह राज्यभरात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच भाजपचे रणनीतीकार अलर्ट (BJP strategists on ‘alert’)झाले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरामधील ज्येष्ठ मंत्री गुलाबराव पाटील यांचा राजकीय बालेकिल्ला असलेल्या जंबोरी येथील एका मोठ्या सभेला संबोधित केले. शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, पाचोराच्या मेळाव्यात जवळपास चेंगराचेंगरी झाल्याच्या वृत्तानंतर मातोश्रीवरील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कारण शिवसैनिक आदित्य ठाकरेंना भेटण्यासाठी मंचाजवळ धडकत होते. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, राज्यातील भाजपच्या रणनीतीकारांना भीती वाटत आहे की,शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही शिवसेनेच्या बंडखोरीशी जुळवून घेणार नाहीत,उलट ते राज्यातील गोंधळाला जबाबदार असल्याचा आरोप करतात.त्यात ठाकरे पिता-पुत्रांच्या ‘पाठीत खंजीर’ या वक्तृत्वाचा मुकाबला करण्यासाठी शिंदे गट पर्यायाने भाजपला (BJP) मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यातही मतदार अनेकदा ‘सहानुभूतीपूर्ण’ बोलण्याने भारावून जातात. त्यामुळे सहानुभूती ही ठाकरे यांच्याकडेच जाणार असल्याने आता कोंडी कुणाची हाच प्रश्न महत्वाचा ठरला आहे. (Aditya Thackeray’s statewide tour: Now BJP strategists on ‘alert’)