मुंबई।भाजपा स्वतःला पार्टी विथ डिफरन्स (party with a difference) म्हणत होती. मग तीच भाजपा ( BJP)या मिंधे आणि चिंधी सरकारबरोबर कशी? देशात हे आता ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहोत हे या भ्रष्ट लोकांसह बसून कसं सांगणार? असा थेट सवाल ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray’s direct question) यांनी केला आहे.
ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिकेत गेल्या वर्षभरात खोके सरकारचा जो भ्रष्टाचार सुरु आहे. त्याविरोधात आपण वेळोवेळी आम्ही आवाज उठवला आहे. रस्त्यांचा घोटाळा, खडीचा घोटाळा, सॅनेटरी पॅड व्हेंडिंग मशीनचा घोटाळा असे अनेक घोटाळे मुंबई महापालिकेत होत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून ते होत असतील. असे खूप घोटाळे राज्यभरात होत आहेत. मुंबईतले जे घोटाळे समोर आले आहेत त्याविरोधात आम्ही १ जुलैला मोर्चा काढणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागच्या वर्षभरात आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या पैसे घेऊन केल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अधिकारी पैसे मागत आहेत. कृषी क्षेत्र कोलमडलं आहे, वेदांता फॉक्स कॉन अशी भयंकर परिस्थिती कधीही महाराष्ट्रात आली नव्हती.याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कर्नाटकात आपण ४० टक्के सरकार समजत होतो मात्र इथे १०० टक्के खोके सरकार झाले आहे अशी खोचक टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबई महापालिका ही हुकूमशाही राजवटीत चालवली जात आहे. याच मुंबई महापालिकेने जे गद्दार, घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगतात की, बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत, त्यांच्याच फोटोवर हातोडा मारला आणि बुलडोझर चालवला आहे. हे शिवसैनिक आणि महाराष्ट्र सहन करणार आहेत का? हे सगळं सच्चा शिवसैनिक लक्षात ठेवणार आहे असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.(Aditya Thackeray’s direct question: … So how will BJP say ‘party with difference’ in the country?)