मुंबई ।सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांचे खंडपीठ फैसला करणार आहे. हे तात्पुरतं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असा दावा शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केला आहे.इतकेच नाही तर राज्यात एक मुख्यमंत्री आणि एक डमी मुख्यमंत्री आहेत असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
गद्दारांच सरकार तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला देशात आणि राज्यात काय चालले आहे ते मान्य आहे का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला आहे. (Aditya Thackeray: This temporary government will collapse, it will collapse!) हे तात्पुरतं सरकार निवडणुका जेवढ्या लांबवायच्या तेवढ्या लांबवणार आहेत. कारण यांना माहित आहे की, विजय आपल्या शिवसेनेचा (SHIVSENA)होणार आहे. मात्र आपण कामे केली आहेत. लोकांना हे सगळं माहित आहे. त्यामुळे लोकच या सरकारचा निवाडा करतील असेही ते म्हणाले.
संपूर्ण देशात कुटुंबप्रमुख आणि प्रामाणिक माणूस म्हणून ओळखले जातात ते उद्धव ठाकरेच. सध्याचे सरकार हे धुळफेक करणारे सरकार आहे. महाराष्ट्रात सध्या एक सीएम आणि एक डमी सीएम आहेत. हे सरकार आश्वासने देते पण ते पूर्ण करत नाही. कोविड काळात आपण चांगले काम केले आहे. ते लोकांपर्यंत पोहचवायचे आहे,असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले आहे. (Aditya Thackeray: This temporary government will collapse, it will collapse!)