मुंबई । महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप भाजपावर होत असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन (Vedanta-Foxcon project) शिंदे सरकारवर (Shinde government) टीकेची तोफ डागली आहे. कंपनी गुजरातमध्येच कशी गेली? इतर राज्यात का नाही गेली? आपलं सरकार खोके सरकार, स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके हेच सध्या सुरु आहे, अशा शब्दात आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
वेदांतचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात स्थापन न करता गुजरातला जाणार असल्याच्या बातमीवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, वेदांतचा प्रोजेक्ट आता गुजरातला गेलेला आहे. वेदांत आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे हे चांगलेच आहे. तरी देखील या प्रोजेक्टसाठी एक वर्षात अनेक बैठका घेऊन अनेक भेटी देऊन पुण्याच्या जवळ हा प्रोजेक्ट येईल अशी काळजी घेऊन आम्ही काम करत होतो. तेच पुढे नेत असताना मागच्या महिन्यात आम्ही बघितले की या खोके सरकारने देखील आमच्याच कामावर पुढे केलेले आणि महाराष्ट्राला आश्वासन दिलेले की हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात येणार आहे. तरीदेखील आज ही बातमी वाचून थोडा धक्का बसला आहे की, हा मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेलेला आहे.(Vedanta’s project has now gone to Gujarat) कोणत्याही ही राज्यात गेल्याचे दुःख नाही मात्र आपल्या राज्यात हा प्रोजेक्ट आला कसा नाही याचेच आश्चर्य आहे.
पिस्तुल चालवणं, धक्काबुक्की करण्यापेक्षा…
महाराष्ट्रात हजारो रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत प्रोजेक्टने आपला मोर्चा गुजरातला वळविला आहे. राज्यातील खोके सरकारवर विश्वास नसल्यानेच वेदांत प्रोजेक्ट गुजरातला वळाला असे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यास खोके सरकारला इच्छा नाही, अशी टीकाही युवासेना प्रमुख व माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. पिस्तुल चालवणं, धक्काबुक्की करण्यापेक्षा महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येईल यावर लक्ष द्या अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला सुनावले आहे.
ज्या प्रोजेक्टला महाविकास आघाडी सरकारने पूर्ण पाठबळ देऊनही हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात का आला नाही. याचा अर्थ हाच आहे की, नवीन गुंतवणूकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही. आज आपण बघत आहात की खोके सरकार हे राजकारणात व्यस्त आहे. प्रशासनावर ,कायदा सुव्यवस्थेवर कोणाचा अंकुशही दिसत नाही.त्यामुळेच या गोष्टी होत आहेत. माझी हीच विनंती या खोके सरकारला राहील की, थोडं पिस्तूल काढणं, धक्काबुक्की करणं ,खोके- गुंडा गर्दीची भाषा करणं सोडून द्यावं आणि मोठ्या इंडस्ट्रीजना आपल्या राज्यात आणण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असा सल्लाही आदित्य ठाकरे यांनी दिला.((Aditya Thackeray: New investors don’t trust this ‘box government’))