मुंबई ।‘वेदान्त फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना संघर्ष आणखीनच पेटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मात्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Chief Minister Eknath Shinde)थेट जाहीर आव्हानच दिले आहे.(Tata-Airbus project)त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा आणखीनच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी सत्ताधारी कोणती पळवाट शोधतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
खोटं बोलण्याचे नाट्य सुरु असून हे आता संपले पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी देशात अनेक राज्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे असे म्हटले आहे. पण स्पर्धेबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्र कुठे कमी पडतोय का? याबाबत चर्चा करण्यासाठी मी त्यांना आव्हान देतो. हे आव्हान मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे आणि माझ्यासमोर चर्चेला यावे , असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
मी उपमुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, टाटाच्या ज्या उच्च अधिकाऱ्याने महाराष्ट्रात वातावरण योग्य नाही सांगितलं त्याचे नाव सांगावे. दादागिरी सत्ताधारी पक्षाकडूनच चालते, आमच्याकडून कोणालाही धोका नाही. या अधिकाऱ्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना उद्योगासाठी चांगले वातावरण नव्हते असे सांगितले हे त्यांनी जाहीर करावे. कारण आम्हाला केंद्र सरकार सांगेल तिथे आम्हाला जावे लागेल असे सांगण्यात आले होते , असेही आदित्य ठाकरेंनी ‘टाटा-एअरबस’ प्रकल्पासंबंधी बोलताना सांगितले.
… हे फडणवीसांचे अपयश
हा प्रस्ताव जर सप्टेंबर २०२१ मध्ये झाला असेल तर मग नितीन गडकरी तसंच आम्ही सर्वांनी पत्र का लिहिलं? कदाचित आम्हाला माहिती नसेल पण तुम्ही २०१६ पासून पाठपुरावा करत असाल तर हे तुमचं अपयश आहे. २०१६ ते २०१९ दरम्यान राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार असतानाही नागपूरमधील मिहानमध्ये तुम्ही हा प्रकल्प आणू शकला नाहीत.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस?
२३ सप्टेंबर २०२१ रोजी टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये होतोय अशी बातमी आली होती. तेव्हा कोणाचे सरकार होते? आम्ही विरोधीपक्षात गेलो की राज्य विसरत नाही. २०१६ साली हा प्रकल्प येत होता, तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र दोघेही स्पर्धेत होते. तेव्हा मी म्हणालो होतो की, गुजरातपेक्षा जास्त जागा देऊ. त्यानंतर सरकार बदलले आणि मी विरोधी पक्षात असतानाही टाटाच्या प्रमुखांना माझ्या ‘सागर’ या निवासस्थानी बोलावले. त्यावेळी त्यांनी इथले वातावरण उद्योगासाठी योग्य नाही असे सांगितले,असा दावा फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला.(Aditya Thackeray: Come to a face-to-face discussion, a direct challenge to the Chief Minister)