पुणे। लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करू या … देशाच्या सुरक्षतेसाठी सदैव दक्ष राहू या … स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,महिलांचा आदर ,सर्वांचा सन्मान हेच खरे स्वातंत्र्य देश आधी , बाकी सारे नंतर याची जाणीव म्हणजे स्वातंत्र्य या घोषणा देत स्वातंत्र्यदिनी माजी उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul’s initiative)आयोजित एकात्मता रॅलीमध्ये (Unity Rally) नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वातंत्र्याचा जागर करताना एकीचे दर्शन घडविले.
यंदा 15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याचे 75 वर्ष साजरे करताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्व देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आयोजित केलेल्या एकात्मता रॅलीमध्ये देशभक्तीपर गीतांवर नृत्याविष्कार, 75 मीटर तिरंगा ध्वज , तिरंगी झेंडे व स्पीकर याने सर्व परिसर देशभक्तिमय झाला होता. या एकात्मता रॅलीचे हे १५ वे वर्ष होते. रॅलीच्या प्रारंभी असलेल्या बग्गीमध्ये देशासाठी प्राणाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेतील मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थी , महिलांचा लक्षणीय सहभाग , ज्येष्ठ नागरिक असो ,रस्त्यावरून जाणारे नागरिक असो, या एकात्मता रॅलीत सहभागी होत होते.रॅलीसमवेत देशभक्तीपर गीतांवर लष्कराच्या वेशभूषेतील मुले – मुलींचे सादरीकरण आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.
यावेळी आबा बागुल म्हणाले की, देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. पुढे अनेक वर्षे हे स्वातंत्र्य चिरायू ठेऊन भारताला प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी तरुणांवर आहे. तरुणांनी क्रोध,लोभ,धर्म धर्मातील तेढ याला तिलांजली देऊन राष्ट्रीय एकात्मता जोपासावी असे आवाहन आबा बागुल यांनी यावेळी केले. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे,रमेश भंडारी उपस्थित होते.एकात्मता रॅलीचे संयोजन अमित बागुल(Unity rally was coordinated by Amit Bagul),इम्तियाज तांबोळी,संतोष पवार,सुरज सोनवणे,राजेश देवेंद्र,समीर शिंदे यांनी केले. सागर आरोळे यांनी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिक, विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.(Aba Bagul’s initiative)