पुणे। देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण कायम राहावे आणि नव्या पिढीला या हुतात्म्यांची माहिती होणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते (former group leader of the Congress Party in Pune Municipal Corporation,Aba Bagul )आबा बागुल यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय काँग्रेसकडून (All India Congress)संपूर्ण देशात ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आझादी गौरव पदयात्रा (Azadi Gaurav Padayatra) प्रत्येक जिल्ह्यात काढली जात आहे.त्यानुसार पुण्यातही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेसअंतर्गत पर्वती ब्लॉक काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या आझादी गौरव पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या नेत्तृत्वाखाली शिवदर्शन येथील राजीव गांधी ई -लर्निंग स्कुल येथे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेला प्रारंभ झाला.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अभय छाजेड, संजय बालगुडे,पुणे शहर काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे द. स. पोळेकर, पर्वती ब्लॉक काँग्रेसचे सतीश पवार, रमेश सोनकांबळे, सुनील ओव्हाळ, दीपक ओव्हाळ, गोरख मरळ, संतोष गेळे, संतोष पाटोळे, साई कसबे, ज्योती आरवणे आदींसह पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, सद्यस्थितीत देशात जातीपातीचे राजकारण पेटले आहे. धार्मिक तेढ वाढत आहे. याला लगाम घालणे आवश्यक आहे. त्यासाठीच काँग्रेस पक्षाचा सर्वधर्मसमभाव हा नारा देशाची एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी महत्वाचा आहे. काँग्रेस पक्षाने सर्वधर्मसमभाव कायम जोपासला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारानेच आज आपण देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन पाहत आहोत. अहिंसा हाच खरा मार्ग आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी आहे. त्याचाच अवलंब आजच्या पिढीने करावा,असेही आबा बागुल म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यात हुतात्म्यांचे बलिदान मोठे आहे. १९४२चा स्वातंत्र्य लढा, चलेजाव चळवळ यातून आज आपण आज स्वातंत्र्य अनुभवत आहोत.अरविंद शिंदे म्हणाले,आजच्या तरुण पिढीने महात्मा गांधीचे विचार जोपासले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. ही पदयात्रा शिवदर्शन येथून निघून अरणेश्वर,ट्रेझर पार्क मार्गे पद्मावती येथे नालंदा बुद्ध विहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या पदयात्रेचा समारोप झाला. या आझादी गौरव पदयात्रेचे संपूर्ण संयोजन काँग्रेसचे युवा नेते अमित बागुल (Congress youth leader Amit Bagul)आणि सहकाऱ्यांनी केले. (Congress Azadi Gaurav Padayatra)