Aam Aadmi Party: A Nationwide 'Modi Hatao-Desh Bachaoche' Poster Campaign Against PM Modi

Aam Aadmi Party: पीएम मोदींविरोधात आपचे देशभरात ‘मोदी हटाओ-देश बचाओचे’ पोस्टर कँपेन ;पण…  

अहमदाबाद। दिल्लीतून देशभरात मोदी हटाओ-देश बचाओचे  (poster campaign of Modi Hatao-Desh Bachao across the country  ) पोस्टर मोहीम सुरु करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) आठ जणांना गुजरातमध्ये अटक (Eight members of the Aam Aadmi Party have been arrested in Gujarat) करण्यात आली आहे. त्यावरून आम आदमी पक्षाने तुम्ही कितीही जोर लावला तरी आम्ही लढतच राहू असा पवित्रा कायम ठेवला आहे.शिवाय हा भाजपच्या हुकूमशाहीचा (BJP’s dictatorship)  नमुना आहे.अशी टीकाही केली आहे. 

गुजरातमधील अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (PM Modi) पोस्टर लावल्याप्रकरणी आपच्या 8 जणांना अटक करण्यात आली. आम आदमी पक्षाच्या (आप) पोस्टर मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर एका दिवसाने या अटक करण्यात आल्या आहेत.यावर अहमदाबाद पोलिसांनी सांगितले की, शहरात ठिकठिकाणी पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टर लावण्यात आले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 या पार्श्वभूमीवर  गुजरात आपचे प्रमुख इसुदन गढवी म्हणाले की, अटक करण्यात आलेले आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. गढवी म्हणाले,हा भाजपच्या हुकूमशाहीचा नमुना आहे.मोदी हटाओ-देश बचाओचे पोस्टर लावल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. भाजपची ही भीती नाही तर दुसरे काय आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते लढत राहणार आहेत.

 ‘आप’ने मोदी हटाओ-देश बचाओ पोस्टर मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम देशभरात 11 भाषांमध्ये सुरू आहे. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू व्यतिरिक्त गुजराती, पंजाबी, तेलगू, बंगाली, उडिया, कन्नड, मल्याळम आणि मराठी भाषांमध्येही ही मोहीम राबविण्यात येत आहे.(Aam Aadmi Party: A Nationwide ‘Modi Hatao-Desh Bachaoche’ Poster Campaign Against PM Modi!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *