A shock to the BJP in the stronghold of the RSS: Congress's loud celebration in Nagpur

A shock to the BJP in the stronghold of the RSS: काँग्रेसचा जोरदार आनंदोत्सव 

नागपूर ।विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघात (Nagpur Teachers Constituency of the Vidhan Parishad) महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाल्याने भाजपला (BJP) मोठा धक्का बसला  आहे. भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेल्या नागो गाणार यांचा सात हजार मतांच्या फरकाने पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात  भाजपची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh)  मुख्यालय नागपूरचे. त्यात  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे  नागपूरचेच असतानाही  या ठिकाणी भाजपच्या झालेल्या या पराभवाचीच चर्चा रंगत आहे. परिणामी आगामी निवडणुकांमध्ये चित्र आणखी वेगळे असेल असे तर्कही लढवले जात आहे. त्यामुळेच   विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये जोरदार आनंदोत्सव ( Congress’s loud celebration in Nagpur) साजरा केला.

भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे   मुख्यालय असणाऱ्या नागपूरमध्ये झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. भाजपला बालेकिल्ल्यातच  हा दणका बसला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर नागपूरमधल्या पराभवाचे विश्लेषण करू, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

 विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी बाजी मारली.  त्यांनी भाजपचा पाठिंबा घेऊन लढणारे उमेदवार नागो गाणार यांना धूळ चारली. गाणार हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. अडबाले यांना 16500 मते मिळाली, तर गाणार यांना 6366 मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत अडबाले यांना 14071 मते मिळाली. तर गाणार 6309 मतांवर राहिले. अडबाले यांनी पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला.मात्र भाजपसाठी प्रतिष्ठेची असणारी जागा गमावल्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.  विशेष म्हणजे गाणार यांच्यासाठी गडकरी, फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. मात्र, त्यात विजय मिळवणे पक्षाला जमले नाही.

अशी रंगली लढत 

नागपूर शिक्षक मतदारसंघात 22 उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत भाजप समर्थक नागो गाणार आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्यात झाली. अडबाले यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करणारे सतीश ईटकेलवारही रिंगणात होते. मात्र, बंडखोरी केल्यामुळे ईटकेलवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली होती. या अटीतटीच्या लढतीमध्ये अडबाले यांनी गाणार यांच्यावर जवळपास सात हजार मतांनी विजय मिळवला आहे.(A shock to the BJP in the stronghold of the RSS: Congress’s loud celebration in Nagpur)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *