Raj Thackeray,Praveen state president of Maratha Seva Sangh-Sambhaji Brigade Facebook post Maharashtra

‘राज  ठाकरेंना  पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही’

पुणे :
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या  जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा आरोप करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
  राज ठाकरे यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही.त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही.  राजकारणात कुठलेही नवनिर्माण न करता आलेला आणि राजकारणात  सपशेल अपयशी ठरलेला माणूस  आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे . अशा शब्दात प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टवरून टीका केली आहे.
प्रवीण गायकवाड यांनी पुढे म्हटले आहे कि, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करताना राज ठाकरे  दिसत आहेत , ठीक आहे.  परंतु हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की. असेही गायकवाड यांनी नमूद केले आहे.

1 thought on “‘राज  ठाकरेंना  पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही’”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *