Contribution of YouTube creators to the strengthening of the country's GDP

YouTube creators:देशाचा जीडीपी मजबूत करण्यामध्ये योगदान!

युट्यूब वरील ४०,००० पेक्षा अधिक चॅनल्सना १ लाख पेक्षा जास्त ग्राहक मिळाले आहेत. दरवर्षी त्यात ४५ टक्के वाढ होत आहे. देशात सहा आकडी किंवा त्यापेक्षा जास्त कमाई करणाऱ्या चॅनलची संख्या दरवषी ६० टक्क्यांनी वाढत आहे.त्यात ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने  दिलेल्या एका अहवालानुसार युट्यूब क्रिएटर्स म्हणजे युट्यूब वर व्हिडीओ बनविणाऱ्यानी व्हिडीओ बनवून २०२० मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत ६८०० कोटींचे योगदान दिले आहे.(Oxford Economics, YouTube creators have contributed Rs 6,800 crore to India’s economy by 2020. ) युट्युबर्सनी ६,८३,९०० फुल टाईम नोकऱ्यांच्या बरोबरीने देशाची जीडीपी( country’s GDP)मजबूत करण्यास हातभार लावला आहे.

इंटरनेट, स्मार्टफोन काळात कमाईसाठी नोकरी व्यवसायाशिवाय अनेक मार्ग उपलब्ध झाले असल्याचे यामुळे अधोरेखित झाले आहे. डिजिटल युगात कमाईचे अनेक नवे मार्ग  विकसित होत आहेत.  देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्या ९२ टक्के छोट्या आणि मध्यम उद्योगांनी युट्यूबच्या मदतीने जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळाल्याचे मान्य केले आहे. जसजशी युट्यूब जगातील प्रेक्षकांशी जुळत आहे.  त्यावरून मिडिया कंपन्यांची पुढची पिढी निर्माण करण्यात अधिक प्रभावी ठरत आहे हे दिसून येत आहे. गतवर्षीचे आकडे सांगतात, देशात ४४.८ कोटी जनता युट्यूबचा वापर करते आहे. ५३ कोटी जनता व्हॉटस अप, ४१ कोटी फेसबुक, २१ कोटी जनता इन्स्टाग्रामचा वापर करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *