पुणे।
भाजपची सत्ता 2024 मध्ये आली, तर ते संविधान बदलू शकतात,असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ( Criticism of Prakash Ambedkar ) केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर आपले म्हणणे मांडले. विरोधकांना केंद्र सरकारकडून ईडी आणि सीबीआयची भीती दाखवली जात आहे. भाजपची सत्ता 2024 मध्ये आली, तर ते संविधान ( constitution) बदलू शकतात, असे ते यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांनी काल आणि आज काँग्रेसवर (CONGRESS) जोरदार टीका करताना देशातील कोरोना महाराष्ट्र काँग्रेसने वाढवला, असा आरोप केला होता. त्यावर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, सभागृहात पंतप्रधान खोटे बोलले, हे सुद्धा काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते सभागृहात बोलू शकले नाहीत, अशी टीका करताना देशात कोरोना मोदी घेऊन आल्याचा आरोपत्यांनी केला.
सपाला मदत करा
जी लढाई उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत दिसत आहे, ती समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही सपाला समर्थन देत आहोत. सर्व आंबेडकरवादी जनतेला देखील मी सांगत आहे, की उत्तर प्रदेशमध्ये सपाला मदत करा. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो. त्यामुळे आम्ही सपाला मदत करायचा निर्णय घेतला आहे,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
फक्त भाजप आणि आरएसएस सोडून
आगामी मुंबई महानरपालिकेच्या निवडणुकीवरही आपली भूमिका मांडताना ते म्हणाले, मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळी आम्ही गांभीर्याने लढणार आहोत. आम्ही युतीसाठी सर्वांना दरवाजे उघडे ठेवले आहेत. फक्त भाजप (BJP) आणि आरएसएस (RSS )सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची आमची तयारी असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली.