Prashant Kishor, who was an election strategist for various political parties including BJP, then Congress and then JDU, will no longer be strategizing for others. Due to a tweet, such a discussion is going on in the political circles and as he hinted on Twitter that Prashant Kishor will now take his own side, what is the next strategy of Prashant Kishor?

होय,२०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य आहे!

नवी दिल्ली।
 २०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य आहे अशा स्पष्ट शब्दात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजप विरोधी पक्षांना विश्वास दिला आहे.
एका मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी विरोधी पक्षांची एक आघाडी उभारण्यासाठी आपण मदत करु इच्छितो, असे  म्हटले आहे.तसेच  २०२४ मध्येही आघाडी भाजपला पराभूत करु शकते, असा विश्वासही प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे. हे खरोखर शक्य असल्याचे सांगतानाच पुढील महिन्यामध्ये पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीही लागले, तरी २०२४ मध्ये भाजपला पराभूत करणारी आघाडी बांधता येईल, असेही ते म्हणाले आहेत. आगामी पाच राज्यांमधील निवडणुका या लोकसभेची पूर्वतयारी मानल्या जात असतानाही या निवडणुकांच्या निकालावर आधारित न राहता २०२४ मध्ये भाजपला पराभूत करता येईल. मात्र त्यासाठी थोडा समजूतदारपणा वेगवेगळ्या राजकीय पक्षांना दाखवणे गरजेचे आहे. एका नवीन राष्ट्रीय पक्षाऐवजी राजकीय परिस्थितीबद्दल विचार करताना थोडा बदल केल्यास, हे शक्य असल्याचेही  प्रशांत किशोर यांचे ठाम मत आहे. २०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य आहे का? माझे याला ठामपणे उत्तर होय असे आहे. पण सध्या वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि पक्षांची धोरणे पाहता हे शक्य आहे का? असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर कदाचित नाही, असे द्यावे लागेल, असे मतही  प्रशांत किशोर यांनी मांडले.

 

निश्चय केल्यास…

जर तुम्ही बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळचा विचार केल्यास लोकसभेच्या जवळजवळ २०० जागा आहेत. पक्षाची लोकप्रियता शिगेला असतानाही भाजप या ठिकाणी ५० च्या आसपासच जागा जिंकू शकली. बाकी राहिलेल्या  जागांपैकी भाजप कोणासाठी काहीच सोडत नसल्याचे सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करताना प्रशांत किशोर म्हणाले. यावरुन असे दिसून येते की काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेस किंवा अन्य एखादा पक्ष अथवा या पक्षांचा एकमेकांमध्ये ताळमेळ बसून एक आघाडी तयार होणार असेल, तर त्यांनी एकत्रित येऊन आम्ही २०० पैकी १०० जागा जिंकणार असा निश्चय केल्यास विरोधी पक्षांना त्यांच्या लोकसभेमधील जागा २५०-२६० पर्यंत वाढवता येतील, असेही प्रशांत किशोर यांनी   म्हटले आहे. अशाच प्रकारे उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये १०० आणखीन जागा मिळवून भाजपला पराभूत करणे शक्य असल्याचा विश्वास प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे.   मुद्द्यांच्या जोरावर एक विजयगाथा सादर केली आहे. विरोधी पक्षांना भाजपला पराभूत करण्यासाठी किमान यामधील दोन मुद्द्यांवर आघाडी मिळावी लागेल. तसेच एक काथकथित ‘महागठबंधन’ तयार करण्याबरोबरच बरच काही करावे लागणार असल्याचेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

२०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य आहे, पण त्यासाठी विरोधी पक्षांना खऱ्या अर्थाने एकत्र यावे लागेल, असे प्रशांत किशोर म्हणाले आहेत. २०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य पण त्यासाठी विरोधी पक्षांनी खऱ्या अर्थाने एकत्र येण्याची गरज असल्याचेही प्रशांत किशोर म्हणाले आहेत. यासाठी त्यांनी बिहारचे उदाहरण दिले. बिहारमध्ये २०१५ नंतर एकही ‘महागठबंधन’ यशस्वी झाले नाही. केवळ राजकीय पक्ष आणि नेत्यांनी एकत्र येऊन काही होत नाही. भाजपला हरवण्यासाठी तुम्हाला भावनात्मक आणि सुनियोजित पद्धतीने एकत्र येण्याची गरज असल्याचेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *