नांदेड
मी कुठलीही आढावा बैठक घेतली नाही. मी माझ्या अखत्यारित असलेल्या विषयावर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि मला तेवढा संविधानाने अधिकार दिला आहे. अशा शब्दात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भूमिका मांडली मात्र राजकारण्यांकडून राजकारण केले जात आहे, ते त्यांना करू द्या. परंतु पत्रकार तर राजकारण करत नाही ना असा उपरोधिक सवालही त्यांनी पत्रकारांनाच केला.

राज्यपाल हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत या दौर्यात ते विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच काही ठिकाणी आढावा बैठक घेणार असल्याच्या चर्चेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच राज्यपालांच्या जिल्हा आढावा बैठकीला आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड येथे राज्यपालांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मी कोणतीही आढावा बैठक घेतलेली नाही. फक्त मला संविधानाने दिलेले अधिकार वापरून विकासासंदर्भात मी काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र या संदर्भात राजकारण्यांकडून राजकारण केले जात आहे, ते त्यांना करू द्या. परंतु पत्रकार तर राजकारण करत नाही ना. असा उपरोधिक सवाल त्यांनी पत्रकारांना केला. कोविडच्या काळात येता आले नाही म्हणून आता तरी नांदेड पाहायला जावं म्हणून हा दौरा आखला असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी स्पष्ट केले.