BJP lags behind despite winning most seats! Mumbai. With the result of Nagar Panchayats in the state, there is an atmosphere of happiness in the Mahavikas Aghadi faction, while BJP, despite being the largest party in the state, has fallen behind by winning 384 seats. Elections were held for 106 Nagar Panchayats in the state. The result came today. Among them, 24 Nagar Panchayats have been taken over by BJP. This is followed by NCP in 25 Nagar Panchayats, Congress in 18 places and Shiv Sena in 14 places. In this election BJP got 384 seats, NCP got 344 seats, Congress got 316 seats and Shiv Sena got 284 seats. Similarly, the Communist Party (M) has won 11 seats, the BSP 4, the MNS 4, other parties 82 and the independent candidates 206 seats. Therefore, despite winning the highest number of seats, the BJP has lagged behind.

सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप पिछाडीवर!

मुंबई। राज्यातील नगरपंचायतींच्या निकालाने महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे तर ३८४ जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरूनही  भाजप पिछाडीवर पडला आहे. राज्यातील १०६ नगरपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली  होती. आज निकाल लागला. त्यामध्ये भाजपच्या ताब्यात २४ नगरपंचायती गेल्या आहेत. तर त्याखालोखाल २५ नगरपंचायतीत राष्ट्रवादी, १८ ठिकाणी काँग्रेस तर १४ ठिकाणी शिवसेनेची सत्ता आली आहे. या निवडणुकीत भाजपला ३८४, राष्ट्रवादीला ३४४, काँग्रेसला ३१६ तर शिवसेनेला २८४ जागा मिळाल्या आहेत. तसेच कम्युनिष्ट (एम) पक्षाला ११, बसपाला ४, मनसेला ४, इतर पक्षांना ८२ तर अपक्ष उमेदवारांना २०६ जागा मिळाल्या आहेत.भाजपच्या ताब्यात २४ नगरपंचायती आल्या असल्या तरी महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर ५७ नगरपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही   भाजप पिछाडीवर गेला आहे.  मात्र महाविकास आघाडी राज्यात असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तीनही पक्ष मिळून ९४४ जागा जिंकल्याने एकप्रकारे महाविकास आघाडीची सरशी झाल्याचे चित्र आहे. भाजपच्या ताब्यात २४ नगरपंचायती आल्या असल्या तरी महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर ५७ नगरपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही एकप्रकारे भाजप पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.

पक्षनिहाय जागांमध्ये उद्या बदल

दरम्यान, शिर्डी नगरपंचायतीत १७ प्रभागांपैकी ११ प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे तेथे मतदान होऊ शकले नाही. तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्व ९ नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी २० जानेवारी रोजी होणार असल्याने पक्षनिहाय जागांमध्ये उद्या बदल होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *