पुणे |नियोजनबद्धरित्या विकासकामे आणि नागरी सुविधा नागरिकांना तत्परतेने उपलब्ध करून देणे यालाच आमचे सदैव प्राधान्य आहे, असे प्रतिपादन कार्यक्षम नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांनी केले.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्या पुढाकारातून व कार्यक्षम नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांच्या विकासनिधीतून प्रभाग क्रमांक १६ येथील 18, मंगळवार पेठ खड्डा गॅरेज येथे नवीन जलवाहिनेचे काम पूर्ण झाले. त्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त करून सदानंद शेट्टी व सुजाता सदानंद शेट्टी यांचा नागरी सत्कार केला . त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सुजाता शेट्टी म्हणाल्या कि, नागरिकांना मूलभूत सुविधा तत्परतेने मिळाल्याच पाहिजे. त्यासाठी संपूर्ण प्रभागात कोण कोणत्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते, याचा सातत्याने आढावा घेतला जातो आणि त्यानुसार विकासकामे तत्परतेने पूर्ण केली जातात. मात्र कामांचा गुणवत्ता राखण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम पूर्ण करून घेण्याला आमचे नेहमीच प्राधान्य आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना आम्ही दिलासा दिला आहे. कारण ते आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे भेडसावत असलेल्या समस्या आता संपुष्टात आल्या आहेत आणि त्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तसे नियोजन करण्यात आलेले आहे. नागरिकांचा आमच्यावर असलेला विश्वास आम्ही कायम सार्थ ठरवत आहोत.असेही त्या म्हणाल्या.