पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर;पण राहुल गांधींच्या निशाण्यावर! 

नवी दिल्ली| मोदी सरकार हे लोकशाहीविरोधी असल्याची टीका करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करून लोकशाहीसंदर्भात  राहुल गांधी यांनी ‘मोदीजी संकेत समजून घ्या ‘अशी कॅप्शनही दिली आहे.

  अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि जगभरातील लोकशाही धोक्यात असल्याचे वक्तव्य केले. त्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. हॅरिस यांचे वक्तव्य पाहता, जे लोकशाहीला हुकूमशाहीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत,त्यांना हे ऐकून आवडले नसेल, मोदीजी संकेत समजून घ्या अशी कॅप्शन राहुल गांधी यांनी पोस्टला दिली आहे.

पंतप्रधान मोदी व अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष  हॅरिस  यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत हॅरिस यांनी  जगभरातील लोकशाही धोक्यात आहे.  त्यामुळे लोकशाही वाचविण्याची गरज आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी भारताने साथ देण्याची गरज आहे. अमेरिका आणि भारत एकत्रित मिळून लढण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. भारताने अमेरिकेला त्यासाठी साथ द्यावी असे आवाहनही  केले.

‘निवडणुक हुकूमशाही’… राहुल गांधी यांनी यापूर्वीही मोदी सरकार हे लोकशाहीविरोधी असल्याची टीका केली होती. भारत देश आता ‘ लोकशाही राष्ट्र’ राहिला नसल्याचे ट्विटही त्यांनी केले  होते. स्वीडनमधील व्ही- डेम या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालाचा दाखला देत राहुल गांधी यांनी म्हटले होते कि, या अहवालात भारताचा समावेश लोकशाही सूचीमध्ये न करता , ‘निवडणुक हुकूमशाही’ या सूचीमध्ये केला आहे. त्यामुळे हॅरिस यांचे वक्तव्य पाहता,राहुल गांधी यांच्या टीकेला दुजोरा मिळाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!