पुणे। राज्यात सध्या राष्ट्रवादी, काँग्रेस , शिवसेना या तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षांची कमी अधिक प्रमाणात ताकद असते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राष्ट्रवादी पक्षाकडून जिल्हापातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे.अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दिली.
ते म्हणाले,स्थानिक पातळीवर कोणाशी आघाडी करायची याबाबतचे अधिकार राष्ट्रवादीकडून त्या- त्या जिल्ह्यांतील नेत्यांना देण्यात येतात.
राज्यात काही जिल्ह्यात व शहरात कुठे काँग्रेसची ,कुठे शिवसेनेची तर कुठे राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यामुळे प्रत्येकाकडून अधिक जागा मिळाव्यात अशी अपेक्षा केली जाते. अशावेळी स्थानिक पातळीवरच याबाबतचा निर्णय आवश्यक असतो. कुणाशी आघाडी करायची याबाबी पाहता,त्या त्या जिल्ह्यातील नेत्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील निर्णय सोपवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.