Our role is to give reservation to OBC community, for which the state government has unanimously drafted a law. The ordinance has also been signed by the governor; However, if this law is not upheld in the High Court, the Supreme Court, then municipal elections can be held immediately. Therefore, Deputy Chief Minister Ajit Pawar has given a warning not to be ignorant. Besides, the elections will be held in a three-member ward system.

आगामी निवडणुकांमध्ये ​न​व्या चेहर्‍यांना संधी​:​अजित पवार

पुणे|
आगामी जिल्हा परिषद​,​ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये​ नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाईल​,​ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली.
मांजरी बुद्रुक येथे राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अजित दत्तात्रय घुले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन​  उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.​त्याप्रसंगी ते बोलत होते. ​
 ​यावेळी ​अजित पवार म्हणाले​,​ आम्ही खासदार​,​ आमदार​ आणि ​ मंत्री झालो मग खाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनादेखील संधी मिळाली पाहिजे​. ​ ते आमचे कर्तव्य आहे​. ​ त्यामुळेच आगामी जिल्हा परिषद तसेच महानगरपालि​कांसह ​ अन्य निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यां​ना  संधी दिली जाईल तसेच ​जुन्यांचा  समन्वय साधण्याचाही प्रयत्न केला जाईल​. ​ मागच्या निवडणुकांमध्ये तुम्ही तुमच्या भागातून खासदार देखील निवडून देण्याचे काम केले आहे​. ​ तसेच जिल्ह्यातून दहा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि दोन आमदार काँग्रेस​चे  निवडून दिले​. ​ त्यामुळे तुम्ही उत्साहात काम करा​. ​ पक्षाला कुठेही कमीपणा येणार नाही असं काम करू नका​. ​ आम्ही​नव्या  चेहर्‍यांना संधी देणार आणि ते आमचे कर्तव्य आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *