rahul gandhi RSS bjp politics india

महिलांच्या सामर्थ्याकडे ‘त्यांच्या’  कडूनच दुर्लक्ष!

नवी दिल्ली|
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महिलांच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
महिला काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी राहुल गांधी यांनी आरएसएससह भाजपच्या विचारसणीवर टीकेची तोफ डागली.
राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने देशाला महिला पंतप्रधान  दिल्या,मात्र भाजप काय आरएसएसकडे समान वागणुकीसाठी जागा नाही. काँग्रेसची विचारसरणी वेगळी आहे. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून इतर विचारसरणीशी तडजोड करू शकतो;पण भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी तडजोड करू शकत नाही असे स्पष्ट करताना महात्मा गांधी यांच्या काँग्रेस आणि  गोडसे – सावरकरांच्या विचारसरणीत काय फरक आहे ?  हा आमच्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले.
हे खोटे हिंदू आहेत…  भाजप आणि आरएसएसच्या हिंदुत्वाच्या  भूमिकेचा खरपूस समाचार घेताना राहुल गांधी यांनी भाजपकडून फायद्यासाठीच धर्माचा वापर केला जात असल्याचा दावाही केला. ते म्हणाले, भाजपला हिंदुत्वाची काळजी नाही, ते केवळ स्वार्थासाठी धर्माचा वापर करत आहेत. हे खोटे हिंदू आहेत. हिंदू धर्माचा प्रयोग करत आहेत. ते हिंदू नाहीत तर धर्माची दलाली करतात. एकीकडे स्वतःला हिंदू पक्ष म्हणवून घेतात दुसरीकडे लक्ष्मी व दुर्गा यांच्यावर हल्ले करतात. देवतांना संपवितात. त्यानंतर ते हिंदू असल्याचे सांगतात. हे कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत? महिला सशक्तीकरणाचे प्रतिक म्हणजे  लक्ष्मी आणि दुर्गा आहेत. मात्र हे भाजप सरकार नोटबंदी, जीएसटी, शेतकरी कायदे आणि महागाईने हे महिला सशक्तीकरण संपवित असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *