pune politics shivsena bjp

… ‘त्या’साठी शिवसेनेने केला ‘ मोदी देवा’चा धावा!

पुणे।
 उत्साहाच्या भरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्धपुतळ्यासह मंदिर बनविण्याची  भाजपच्या औंधमधील  पदाधिकाऱ्याची कृती भाजपला चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. वरिष्ठ पातळीवरून पुतळा हटविण्याचे आदेश आले आणि रात्रीतून मंदिरातून पुतळा ‘गायब’ करावा लागला . मात्र या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आणि उपरोधिक आंदोलनेही सुरु झाली आहेत. 
महागाईचा मुद्दा घेत आणि मोदींचा पुतळा हटविल्याच्या निषेर्धात शिवसेनेने  महाआरती करून प्रसादाचे वाटप आंदोलन केले. पेट्रोल,डिझेलचे भाव आणि गॅसची दरवाढ कमी करण्यासाठी आम्ही  मोदी देवाचा धावा करण्यासाठी आलो, अशा प्रतिक्रियाही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिल्या. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंदिरातील अर्धपुतळा जरी हटवला असला तरी त्याच  जागी मोदींचे मंदिर उभारावे आणि मंदिराच्या जीर्णोद्वाराचा खर्च केंद्रसरकारने उचलावा तसेच मोदीभक्त मयूर मुंडेंना या मंदिराचे मुख्य पुजारी करावे, अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली. कसबा शिवसेना मतदारसंघातर्फे दांडेकर पूल परिसरात प्रसादाचे वाटपही करण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे,राजेंद्र शिंदे, अनंत घरत ,गौरव सिन्नरकर, युवराज पारीख, प्रतीक आल्हाट ,राहुल जेगटे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *