पुणे : महाडमधील पूरग्रस्तांसाठी शिवाजीनगर गावठाणातील रहिवाशांनी एकत्र येत जीवनावश्यक वस्तूंची मदत करून समाजाप्रती कर्तव्य बजावले.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्या नेतृत्वाखाली महाडमधील पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले. या आवाहनाला शिवाजीनगर गावठाणातील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.एक हजार पूरग्रस्त कुटुंबासाठी अन्नधान्याचे किट, ७०० पाण्याचे बॉक्स घेऊन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्या नेतृत्वाखाली महाडमधील पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जागेवर जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी नगरसेवक उदय महाले, शिवाजीराव पाटील, प्रशांत जगताप, मंदार बहिरट, संदीप शिर्के ,विनायक घुले आदींसह कार्यकर्त्यांनी या मदत मोहिमेत सहभाग घेतला.