मुंबई। उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले की, “आमच्याकडे मतदारसंख्या कमी आहे, (उपराष्ट्रपतीपद निवडणूक 2025) हे आम्हाला माहिती आहे. (शरद पवार) मात्र निकालाची आम्हाला चिंता नाही. आमची ठरलेली मते आहेत आणि त्यापलीकडे काही अपेक्षा नाही.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी(उपराष्ट्रपतीपद निवडणूक 2025) स्वतः फोन करून त्यांच्या पक्षाच्या उमेदवारास पाठिंबा देण्याची विनंती केली होती, अशी माहिती पवार यांनी दिली. ते म्हणाले, “महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार आहेत, (शरद पवार) मात्र राधाकृष्णन हे राज्यपाल असताना झारखंडच्या सीएम यांना त्यांच्या राजभवनात अटक झाली होती. त्यामुळे आम्हाला त्यांना पाठिंबा देणे शक्य नाही.”
पवार म्हणाले की, “लोकसभा आणि राज्यसभा मिळून आमच्याकडे जितकी मते आहेत, तितकीच पडतील. आमचा उमेदवार विजयी होईल एवढी ताकद आमच्याकडे नाही. निकाल काही वेगळा लागेल, अशी अपेक्षाच नाही.”
मतदार यादीविषयी बोलताना त्यांनी (शरद पवार)आरोप केला की, “निवडणूक आयोग स्पष्ट माहिती देत नाही. यापूर्वी ३०० खासदारांना रस्त्यावर उतरावे लागले होते आणि आम्हालाही अटक झाली होती.”
दरम्यान, बिहार दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत पवार म्हणाले, “बिहारसारख्या जागृत राज्यात मत चोरीविरोधात प्रचंड जनजागृती होत आहे. या अनुभवावरून आम्ही(शरद पवार) हा कार्यक्रम आगामी काळात देशभर राबविणार आहोत.”
भारताचे संविधान असावे घरोघरी!
खरेदीसाठी WhatsApp वर ऑर्डर करा आणि घरपोच मिळवा!