रोहित पवार यांचा आरोप

RSSच्या विचारांना भाजपकडूनच  तिलांजली: रोहित पवार 

मुंबई । सत्तेच्या हव्यासात भारतीय जनता पार्टीने नैतिकताच काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ( RSS ) विचारांनाही तिलांजली दिल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. 

 सत्ता संघर्षावर थेट घणाघात करत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवताना  शेतकरी, युवक आत्महत्या, बेरोजगारी, माता-भगिनींवर  होणारे अत्याचार यावर कुणीही बोलायला तयार नाही. (रोहित पवार यांचा आरोप)याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधले आहे. ते म्हणाले, भाजपचे लोकही या प्रश्नांवर बोलायला तयार नाही. त्यामुळे  इतर वाद भाजपकडून  निर्माण केले जात आहे. (RSSच्या विचारांना भाजपकडूनच  तिलांजली) ही भाजपची चाल असून त्यात कुणी अडकू नये. असे आवाहन करताना रोहित पवार यांनी भाजपची रणनीतीच फोडा आणि राजकारण करा अशी असल्याचा आरोप केला.  मराठी-अमराठी, हिंदू-मुस्लीम, ओबीसी- मराठा अशा वादांमध्ये जनतेला अडकवण्याचा डाव भाजपचा (रोहित पवार यांचा आरोप)  असल्याचे सांगितले. शिवाय भाजपचा व्हायरस आमच्या पक्षात शिरला आहे आणि त्यामुळेच पक्षात दुही निर्माण झाली आहे.

अजित पवार यांचे पक्षावर नियंत्रण राहिले नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद करताना अजित पवारांचे मित्रपक्ष जे विष पेरत आहे त्याविरोधात त्यांनी उभे राहिले पाहिजे.अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच  यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी अजित पवार यांचा पक्ष चालत आहे का? त्यांच्या समाधिस्थळी नतमस्तक आपण होत आहोत पण विचारांचे काय? हे सांगण्याची वेळ आता आली आहे. असे स्पष्ट करताना अजित पवार हे खमके नेतृत्व आहे, ते विचार सोडून भाजपसोबत गेल्याने आम्ही त्यांच्यासोबत राहू शकत नाही. प्रशासनाच्या माध्यमातून जे मुद्दे समोर येत आहे, त्यावर त्यांनी आपली पकड घट्ट आहे हे दाखवून दिले पाहिजे.असेही रोहित पवार म्हणाले.  महायुतीतील अनेक नेते केवळ पद आणि पैशाच्या मागे धावणारे आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

 निवडणुकीसाठी भाजपकडून ‘ते’ डाव 

 आम्ही सर्व जण संविधानावर विश्वास ठेवणारे लोकं आहोत.   एका  ट्रॅप मध्ये लोक अडकावेत ही भाजपची भूमिका आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी हिंदू-मुस्लीम  वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केला.आता मुंबईची निवडणूक असल्याने मराठी-अमराठी आणि कबुतर प्रेमी आणि कबुतर न प्रेमी यासह शाकाहारी अन् मांसाहारी या सर्व गोष्टीमध्ये लोकांनी अडकवून ठेवत आहेत. याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!