शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणावरून टीकेच्या केंद्रस्थानी

निवडणुका जवळ आणि ओबीसींचा कळवळा?

पवार-फडणवीसांवर लक्ष्मण हाके यांची जोरदार टीका

मुंबई:।स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, ओबीसी मतांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.(OBC Reservation Politics Maharashtra) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे  सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओबीसींच्या प्रश्नावरून (OBC Reservation Politics Maharashtra)ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे.

 

हाके यांनी पवारांवर आरोप केला की, “ओबीसींशी काहीही संबंध नसताना फक्त मतांसाठी ते गळा काढत आहेत. मंडलशी काय देणे-घेणे आहे, हे पवारांनी स्पष्ट करावे.” तसेच, नागपूरमधून काढलेल्या मंडल यात्रेवरही त्यांनी सवाल उपस्थित केला,“ही यात्रा का काढली? त्यामागचा उद्देश काय? आणि त्यांना मंडल यात्रा काढण्याचा अधिकार कुणी दिला?” (OBC Reservation Politics Maharashtra) याकडे हाके यांनी लक्ष वेधले आहे.शिवाय ओबीसी आरक्षण नेमके कोणासाठी आहे, ते पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते  मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगावे, असेही ते म्हणाले.  

त्याचबरोबर, मुख्यमंत्री फडणवीसांवरही हाके यांनी निशाणा साधला. “ओबीसी हा आमचा डीएनए आहे, असा दावा करणाऱ्या फडणवीसांनी समाजाची फसवणूक केली आहे. जर डीएनए असल्याचा दावा खरा असेल, तर तो सिद्ध करून दाखवा. ओबीसी समाजाच्या मागण्या १५ दिवसांत मान्य करा, अन्यथा ओबीसी रस्त्यावर उतरतील,” असा इशाराही त्यांनी दिला.

हाके यांनी भाजप सरकारवर ओबीसींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करताना सांगितले की, “महाज्योतीला निधी नाही, ओबीसी महामंडळाला अध्यक्ष नाही, हेच भाजपचे वास्तव आहे.” 

।ओबीसी आरक्षण महाराष्ट्र।पवार-फडणवीस टीका।शरद पवार ओबीसी प्रश्न।देवेंद्र फडणवीस ओबीसी राजकारण।प्रा लक्ष्मण हाके।मंडल यात्रा विवाद।महाराष्ट्र निवडणुका 2025

 

🌿 जसा देश, तसा वेष!
स्वच्छ, निर्मळ आणि पांढरे कपडे – व्यक्तिमत्त्वाला शोभणारे.
🛒 [अमेझॉनवर खरेदी करा](https://amzn.to/3HeuNYF)🌿 जसा देश, तसा वेष! स्वच्छ, निर्मळ आणि पांढरे कपडे – व्यक्तिमत्त्वाला शोभणारे. 🛒 [अमेझॉनवर खरेदी करा](https://amzn.to/3HeuNYF)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!